Hot Posts

6/recent/ticker-posts

ईच्छा भगवंताची परिवार आयोजित अजित दादा चषक कबड्डी स्पर्धेचे शानदार पारितोषिक वितरण

 ईच्छा भगवंताची परिवार आयोजित अजित दादा चषक कबड्डी स्पर्धेचे शानदार पारितोषिक वितरण





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीनं सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने २१ ते २५ जुलै दरम्यान निवड चाचणी व जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये ७०हून अधिक संघांनी सहभाग नोंदविला तर ९०० पुरुष महिला खेळाडूंचा यामध्ये समावेश होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लिमयेवाडी येथील शंकर भवन येथे या स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले या अंतिम सामन्याप्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार देवेंद्र कोठे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, राष्ट्रवादी सोलापूर ग्रामीणचे अध्यक्ष उमेश पाटील,सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सो मोनिका देवेंद्र कोठे, शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जुबेर बागवान, शिवसेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, माजी महिला बालकल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण, शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण,माजी उपमहापौर पद्माकर काळे,माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे,माजी नगरसेवक तौफिक शेख,गुरुशांत दुत्तरगावकर, गामा पैलवान,सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार, हाजी मलंग शेठ,अप्पा रोडगे,माजी नगरसेवक पैगंबर शेख, आनंद मुस्तारे, एडवोकेट सुशील सरवदे, माजी नगरसेविका संगीता जाधव, इरफान शेख, करेप्पा जंगम,नारायण माशाळकर, किरण माशाळकर, सुहास कदम, वैभव गंगणे, अमीर शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अजिंक्य पद कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे खेळाडूंचे ओळख होऊन नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आले. या अंतिम सामन्यात जोरदार आक्रमक चढाया अन कौशल्याने होणाऱ्या पकडी चपळाईचा बोनस अशी अटीतटीची लढत करत पुरुष गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब हा विजेता ठरला तर उपविजेता श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लबने पटकावला, महिला गटात श्रीराम स्पोर्ट्स क्लब किशोर गट मुलांच्या स्पर्धेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब विजेता तर उपविजेता श्रीराम तरुण मंडळ यांनी पटकाविला आणि किशोरी मुलींच्या गटात रुकमाई स्पोर्ट्स क्लब ने विजेतेपद पटकावत उपविजेता युनिक पब्लिक स्कूलने कबड्डीच्या विजेते पदाच्या चषकावर नाव कोरले. सदर स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघांना अजितदादा चषक हे आमदार कोठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव, लक्ष्मण मामा जाधव आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भला मोठा हार केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना किसन जाधव म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे या मागचा उद्देश आहे आपण आज माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यानिमित्त मी आपले मनस्वी आभार असल्याचे ते म्हणाले. किसन जाधव हे पक्ष संघटन बरोबरच जनसेवेसाठी नेहमी तत्पर असतात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे किसन जाधव हा सोन्यासारखा माणूस असून अजित दादांचा सच्चा शिलेदार असल्याचे मनोगत यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा सिडको माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव यांनी किसन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की किसन जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून त्यांचे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील कार्य देखील उल्लेखनीय आहे प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमी पाठपुरावा करीत असतात त्यांचे सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या कार्याचे देखील कौतुक केले. यावेळी संतोष पवार आणि उमेश पाटील यांनी देखील आपल्या मनोगतात किसन जाधव यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक तथा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि माजी आमदार संजय शिंदे यांनी देखील भ्रमणध्वनीद्वारे किसन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेच नेटक्या संयोजनाने रंगत स्पर्धेचे नेटके संयोजन करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना स्पर्धेचा आस्वाद घेता आला. मॅटवर झालेल्या ह्या सर्व सामने पाहण्यासाठी प्रथमच हजारो कबड्डी प्रेमींची उपस्थिती लाभली. ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जाधव, कार्यवाहक मदन गायकवाड, प्रकाश जाधव, एल एस जाधव, निरीक्षक गिरीश जाधव, स्वाती पुंजाल, संतोष जाधव रफिक गारे, श्री चंद्रकांत ब्रदर जाधव,श्री राजू दादा जाधव,श्री बबलू भैय्या यादव कटिंग ,समीर विजापुरे, बजरंग गायकवाड, गणेश जाधव, तेजस पैकीकर, मिथुन वडजे, कृष्णा गायकवाड, मेघा गवळी पूजा जाधव गायत्री वायदंडे, रसिका गायकवाड, प्राध्यापिका सुवर्णा कांबळे, प्राध्यापक भक्तराज जाधव, संजय शिंदे, अनिकेत माने, इस्माईल ढवळगी,मरगु जाधव, तन्मय गायकवाड, धनराज जाधव आदींचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुले यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments