समुद्रात स्वत:ची काळजी घ्या आपली घरी सारेजण वाट पहात आहेत- डॉ.जयपाल पाटील
अलिबाग (कटूसत्य वृत्त):- आपण मच्छीमारी साठी खोल समुद्रात नेहमीच जाता तेव्हा बर्फ,पिण्याचे पाणी, जेवणाचे साहित्य,नेहमीची औषधे आठवणीत भरता त्याच प्रमाणे तांडेल वापरीत असलेले सर्वात महत्वाची वायरलेस यंत्रणा,त्याची दोन बॅटरी बरोबर आहेतनां यांची खात्री करून घ्यावी म्हणजे बोटीतील खलाशीवर आपत्ती येणार नाही ज्या अचानक पणे आलेल्या वादळामुळे बोट भरकटत खाली कोकण किनारपट्टीवर, गोवा केरळ गेलात तर नेव्ही आणी पोलीसामुळे घरी याल आणी पाकिस्तान हद्दीत गेलात तर आयुष्य जेलमधे जाईल यासाठीच समुद्रात जातानां मेरी टाईम बोर्डाकडून मिळणाऱ्या सुचनासाठी वायरलेस यंत्रणा बाबीची काळजी घ्यावी.असे मार्गदर्शन ग्रामपंचायत रेवस ने आयोजित आपत्तीव्यवस्थापन कार्यक्रमात रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील केले.यावेळेस व्यासपीठावर प्रशासक प्रितेश पाटील, रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील, माजी सरपंच मच्छिंद्र पाटील, मुख्याध्यापक प्रवीण पाटील, ग्रामसेवक दिनेश राणे आदि मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांकडून छत्रपती शिवाजीमहाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.प्रास्ताविकात प्रितेश पाटील म्हणालेकी आपल्या कडे अनेक प्रकारे आपत्ती येतात त्याला कसे समोरे जायचे याचे ज्ञान प्राप्त असणे आवश्यक असून यासाठीच रायगड जिल्हा परिषद तर्फे ग्रामपंचायतीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याची माहीती आपल्या मित्र परिवार यांस द्यावी. यांनंतर बाळंतपणात 102 व अवघड बाळंतपणात आणी अपघात, साप विंचु दंश वेळेत 108 रुग्णवाहिका,महिलांच्या सुरक्षेबाबत 112 क्रमांक याचा कसा वापर करावा.डाँ.भक्ती पाटील, प्रमुख आरोग्य केंद्र यांनी 20 मिनिटात पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक बवेँ वाहनचालक स्वप्नील पाटील हे 102 रुग्णवाहिका घेऊन आले.ज्येष्ठ व रुग्णास चादरीत व हातावर कसे नेणे याचे प्रात्यक्षिक डॉ.जयपाल पाटील यांनी दिले.महिला सुरक्षे साठी मांडवापोलिस ठाणे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पोलीस हवालदार .प्रदिप देशमुख व महिला पोलीस चंचल सुखेड, येऊन 112क्रमांक ची माहीती दिली.यावेळी 108चे सहाय्यक रायगड जिल्हा प्रमुख अजय जगताप यांनी पेण येथील डॉक्टर अजित हे पायलट सिद्धांत म्हात्रे हे येउन 108 बद्दल माहिती दिली, यावेळी आशा सेविका रुपाली भगत, अंगणवाडी बाई कुमुदिनी कोळी, ग्रामपंचायत कर्मचारी प्रियांका म्हात्रे,मोनिका कडवे,मानसी पाटील,तनुजा पाटील नरेश म्हात्रे,यांनी मेहनत घेतली.शेवटी आभार ग्रामसेवक दिनेश राणे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक मनोज राणे यांनी केले.
0 Comments