गोदुताई गृहनिर्माण संस्थेचा महावितरण विभागाला इशारा; निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र संताप
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- कॉ.गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्था 'क' विभागातील महावितरण कार्यालयाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात संस्थेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. कुंभारी विडी घरकुल वसाहतीतील नागरिकांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वीजबिल वितरण करण्यात आलेले नाही. याशिवाय, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन अचानकपणे तोडणे अशा गंभीर समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ.गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कॉ.फातिमा बेग यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळामार्फत महावितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता श्री. सुनील पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी सहाय्यक अभियंता श्री. पवार यांनी पुढील चार ते आठ दिवसांत वीजबिल वितरण सुरळीतपणे सुरू करण्याचे आणि वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर आवश्यक देखभाल करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
तरीही, या आश्वासनांची अंमलबजावणी पंधरा दिवसांत झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी सचिव आरिफा शेख, प्रभारी कॉ.बापू साबळे, कॉ वसीम देशमुख, कॉ.अफसाना बेग, संचालक तय्यबा देशमुख, सुवर्ण लकापत्ती, मुर्तुजा शिपाई, राधा बंडू, खैरुनिसा खरादी, फर्जना चौधरी, यास्मिन खलिफा, रईसा शेख ,एजाज खलिफा महीबूब मनियार, इमाम शेख, विलास कंदकुरे, श्रीनिवास गोण्याल, मोहसीन शेख, गोविंद सज्जन, बलराज स्वाके, तोफिक तांबोळी व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments