Hot Posts

6/recent/ticker-posts

मी महात्मा ज्योतिराव फुले बोलतोय या एकपात्री नाट्य सादरीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

 मी महात्मा ज्योतिराव फुले बोलतोय या एकपात्री नाट्य सादरीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार तसेच माननीय खासदार व प्रदेशाध्यक्ष माननीय सुरेश तटकरे  साहेब यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर आयोजित राष्ट्रसंत राष्ट्रपुरुष यांचे आचार विचार व कार्य कलेतून प्रबोधनाचा प्रचार व प्रसार सर्व समाजातील सर्वसामान्य नागरिक नागरिकांपासून ते शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने एकपात्री नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून जेकी गेल्या 40 वर्षापासून आपल्या कलेतून प्रबोधन करणारे पुणे येथील ज्येष्ठ कलावंत नटश्रेष्ठ कुमार आहेर यांनी आजतागायत मी संत कबीर बोलतोय, संत तुकाराम बोलतोय, संत गाडगेबाबा बोलतोय, मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय,
 मी लोकराजा राजर्षी शाहू  महाराज बोलतोय,मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय,
 अशा विविध महापुरुषांच्या व्यक्तिरेखा हुबेहूब आपल्या अभिनयाच्या द्वारे सर्वसामान्य समाजापर्यंत आपल्या कलेच्या माध्यमातून प्रसार करणारे कुंभार आहेर यांनी"लक्ष्मीबाई भाऊराव पाटील" महिला महाविद्यालय सोलापूर येथे
 "मी महात्मा ज्योतिबा फुले" बोलतोय या एकपात्री नाट्य प्रयोगाचे सादरीकरण केले .शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने  लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराचे मानकरी चित्रपट,नाट्य अभिनेते व नटश्रेष्ठ कुमार आहेर  यांचा मी" महात्मा ज्योतिबा फुले" बोलतोय ह्या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. नाट्यप्रयोग सुरू होण्यापूर्वी
"महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान प्राचार्य ढेरे सर  जगताप सर व  संस्थेचे जी एम संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मा.बाळासाहेब वाघमारे. यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील सुमारे 400, विद्यार्थिनी व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांच्या समोर महात्मा फुले यांच्या वेशात त्या कालावधीतील अनेक उलघडे आपले अभिनयातून उपस्थितांना  जाणीव करून दिले. नाट्य प्रयोगच्या तास, दीड तासानंतर या कार्यक्रमामधून  समाजामध्ये चाललेल्या जुन्या रुढी परंपरा बंद केल्या पाहिजेत, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. महिला शिकली तरच ती  आपल्या स्वतःबरोबर घरचा किंबहुना देशाचा उद्धार करू शकते यासाठी महिलांनी शिकून सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.यातून सांगण्यात आले.  महात्मा फुले यांच्या काही प्रसंगातून उपस्थितांना  हसवून व तेवढेच आत्मचिंतन करण्यास भाग पाडलं.
 शेवटी कुमार आहेर यांचा सन्मान  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार, जुबेर भाई बागवान, प्राचार्य ढेरे सर, जगताप सर तसेच सामाजिक कार्यकर्तै मा.बाळासाहेब वाघमारे,आशुतोष नाटकर व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यिंनीच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्तावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य  विभागाचे अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी केले.
 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सोलापूर यांच्या वतीने एक आगळावेगळा कलेतून प्रबोधन करणारा मी "महात्मा ज्योतिबा फुले"या एकपात्री नाट्यप्रयोगाचं महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments