ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं सुनील तटकरे यांचे सोलापूरच्या नगरीत केले भव्य दिव्य स्वागत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे सोमवारी तटकरे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर तुळजापूर रोडवरील चव्हाण फर्निचर समोर शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल रॅलीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे हलग्यांच्या कडकडाटात, ढोलीबाजाच्या आवाजात, फटाक्यांची आतिषबाजी करत, भला मोठा हार, शाल,मखमली टोपी, पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य स्वागत केले. तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष तथा महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे देखील यावेळी किसन जाधव यांनी स्वागत केले.याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, माजी नगरसेवक पैगंबर शेख,राष्ट्रवादी महिला जिल्हा पदाधिकारी रुक्मिणी जाधव, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष प्रमिला स्वामी, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस लक्ष्मी आठवले, मीना गायकवाड, राजश्री गायकवाड, सुनिता बिराजदार,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, सागर कांबळे,राष्ट्रवादी शहर सचिव सचिन पिसे, शिवानंद बंडगर अमोल लकडे अमोल जगताप ाष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे, वसंत कांबळे,माऊली जरग, ऋषी येवले, हुलगप्पा शासम, उत्कर्ष गायकवाड, महादेव राठोड,जयेश शिवा पाटणकर, किरण शिंदे, फिरोज पठाण, आनंद गाडेकर, काशिनाथ व्हनकोळे,शहाजान शेख, समद मिस्त्री, हरून शेख ,बाबर सय्यद, ल्याकत सय्यद आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या भव्य दिव्य स्वागतानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्याच्या ताफ्यात शेकडो मोटार सायकल वरून कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी खासदार आनंद परांजपे यांच्या समवेत दिवसभर सहभागी झाले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अव्वल स्थानी राहील यासाठी पक्ष संघटन मजबुतीसाठी आपण सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घेत एकच वादा अजितदादा... राष्ट्रवादी पक्षाचा विजय असो... तटकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा दिल्या यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता.
0 Comments