प्रा. रामदास झोळ फाऊंडेशन यांच्यावतीने रक्तदान शिबिर व वृक्षारोपण
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दतकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिंबे चौफुला,गौरी पेट्रालिअम येथे भव्य रक्तदान शिबिर,वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात स्वतः झोळ सर यांनी रक्तदान करून समाजासाठी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. आजच्या रक्तदान शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच आपल्या थेंबाथेंबातून कोणाचतरी जीवन वाचू शकतं ही भावना मनाला आनंद देणारी आहे "एक थेंब रक्ताचा...अनेकांना नवा श्वास देतो!"
या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी सर्व रक्तदात्यांचे मन:पूर्वक आभार प्रा.रामदास झोळ सर यांनी मानले. शिबिरात वाशिंबे सह पच्छिम भागातील पंचक्रोशीतील २०५ युवक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. तसेच वृक्षारोपण करून प्रत्येकाला नारळाचे झाड भेट दिले.या कार्यक्रमास कार्यकर्ते, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या उपस्थित होते.
0 Comments