राज्य राखीव पोलीस दलात महिलाना संधी मिळणार- आ. रणजितसिंह मोहिते पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- पोलीस भरतीमध्ये मुलांच्या बरोबरीने मुली देखील चांगल्या पध्दतीने काम करित असताना तसेच भारतीय सैन्य दलात महिला यशस्वी होत असतानाही राज्य राखीव पोलीस दलातील भरती प्रक्रीयेत मुलींना संधी दिली जात नसल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.
त्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की राज्याच्या गृह विभागाने महिलांना राज्य राखीव पोलीस दलात संधी देण्याचा निर्णय घेतला असून नागपूर येथे राज्य राखीव पोलीस दलाचा महिलांचा गट/कंपनी निर्माण करण्यास व त्याकरीता १४४ नवीन नियमीत पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यानुषंगाने महिलाना पोलिस दलात सहभागी करून घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्यात येत असून महाराष्ट्राच्या राज्य राखीव पोलीस दलात लवकरच महिला वर्गाची संख्या दिसून येईल असे सांगितले.
मोहिते पाटील यांनी पोलीस भरती प्रकीयेसाठी उमेदवारांना एकापेक्षा जास्त जिल्ह्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास संधी देण्याची मागणी केली यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणीला वेळ लागत असून. उमेदवाराला एकच घटकात अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने भरती प्रक्रिया सुनियोजित व विहित वेळेत पूर्ण करणे शक्य होत असल्याचे सांगितले.आमदार मोहिते पाटील यांनी महिलाना/युवतींना राज्य राखीव पोलीस दलात सहभागी करून घेण्याची मागणी लावून धरल्याने आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला हिरवा कंदील दाखवल्याने राज्य राखीव पोलीस दलात जाऊ इच्छिणाऱ्या महिलांनी आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments