शैक्षणिक दाखले तात्काळ वितरित करण्याबाबत राष्ट्रवादीकडून निवेदन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांना शैक्षणिक लागणारे दाखले तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय यांच्याकडून त्वरित वितरित करण्याबाबत अकलूज उपविभागीय कार्यालय प्रांत अधिकारी पांगरकर यांना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अक्षय भांड यांनी निवेदन दिले. यावेळी माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अमित देशमुख, कार्याध्यक्ष सागर घाडगे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे की शैक्षणिक कामासाठी लागणारे विद्यार्थ्यांचे प्रलंबित दाखले नॉन क्रिमीलेअर जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यार्थ्यांना कॅप राऊंड तंत्रनिकेतन साठी नॉन कॅप रजिस्ट्रेशन सुरू झाले असून अशा अनेक शैक्षणिक प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना दाखल्यांची आवश्यकता भासते त्यामुळे तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय यांच्याकडे विद्यार्थ्यांचे असलेले प्रलंबित दाखले त्वरित वितरित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
0 Comments