विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे माध्यमातून शेतक-यांना ए.आय.तंत्रज्ञान संदर्भात मार्गदर्शन
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्याचे सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी यांचेकरीता कारखान्यामार्फत ऊस शेतीतील कृत्रिम बुध्दीमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञान व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून ए.आय.तंत्रज्ञान या विषयावर शुक्रवार दि.11/07/2025 रोजी मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहीती कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा.आ.बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्यामार्फत युनिट नं.1 व 2 चे सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांसाठी अनेक ऊस विकास योजना राबविणेत येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार दि.11/07/2025 रोजी सकाळी 10.30 वा टेंभूर्णी येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून ऊस शेतीतील कृत्रिम बुध्दीमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन आयोजन करणेत आले होते. या मार्गदर्शन कार्यक्रमाध्ये डॉ.श्री. तुषार जाधव, कृषीतज्ञ- विज्ञान केंद्र, बारामती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. सध्या शेतक-यांनी ऊस शेती ही ए.आय.तंत्रज्ञनाद्वारे करण्याकडे भर देवून त्यामाध्यमातून ऊस पिकास चांगला उतारा मिळवावा. AI तंत्रज्ञान काळाची गरज असून AI तंत्रज्ञानाने हवामानाचा अंदाज येवून त्यानुसार पाणी,खते व फवारणी यांचे नियोजन करता येते, 30 टक्के उत्पादन खर्चात बचत, 40% पाणी बचत ,उत्पादनात 30% पर्यंत वाढ,कीड व रोग यांचे निदान करता येते. तसेच विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे माध्यमातून प्रति एकर शंभर टन योजने अंतर्गत थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.या योजना चालू केल्यापासून अनेक ऊस उत्पादक शेतक-यांनी शंभर टनाच्या पुढे ऊस उत्पादन घेतले आहे. एकरी 100 टना साठी सेंद्रिय खताचा वापर, माती परिक्षण,लागवड योग्य पद्धत,खताची योग्य नियोजन, पाण्याचे योग्य नियोजन व रोग कीड नियंत्रण या बाबींवर भर देणे आवश्यक असल्याचे डॉ.संजीवदादा माने-कृषीरत्न यांनी सांगितले.
ऊस शेतीतील कृत्रिम बुध्दीमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखाने यांना सशक्त व शाश्वत करणेसाठी व्ही.एस.आय.पुणे, एडीटी बारामती, साखर संघ व विस्मा आणि साखर कारखाने यांनी एकत्र काम करणेचा निर्णय घेतलेला आहे. कारखान्यामार्फत लागण हंगाम 2025-26 मध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी सभासदांकरीता कृत्रिम बुध्दीमत्ता (ए.आय.)योजना राबविणेचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला असून ए.आय.तंत्रज्ञानासाठी प्रति हेक्टरी रू.25000/-इतका खर्च अपेक्षीत आहे. या योजने अंतर्गत सभासदांचा सहभाग रू.9000/-,कारखाना रू.6750/- व व्ही.एस.आय.पुणे रू.9250/- असा एकूण रू.25000/- आहे. या योजनेमध्ये कारखान्याचे ज्या सभासदांना सहभागी होणेचे आहे त्यांनी कारखान्याचे शेती विभागाचे स्टाफशी संपर्क करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुरूवातीस प्रेरणास्थान कै.आ.विठ्ठलराव शिंदे यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या प्रसंगी व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, संचालक तथा मा.सभापती विक्रमसिंह शिंदे, शिवाजी डोके,रमेश येवलेपाटील,वेताळ जाधव,लाला मोरे, पांडूरंग घाडगे, तज्ञ संचालक हनुमंत घाडगे, भरत चंदनकर, अशोक मिस्कीन, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे,जनरल मॅनेजर पोपट येलपले,केन मॅनेजर संभाजी थिंटे,ऊस विकास अधिकारी नारायण लगड,युनिट 2 चे मुख्य शेतकी अधिकारी रामचंद्र पाटील, शेती अधिकारी बाबुराव इंगवले, शेती स्टाफ, सभासद व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments