माढा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे एक लाख सदस्य नोंदणी करणार- संजय कोकाटे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे एक लाख प्राथमिक सदस्य नोंदणी करण्यात येणार असून पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंब व गावापासून सुरुवात करून हे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आव्हान शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी केले आहे.
माढा तालुक्यातील रांजणी देवाची येथील ओंकारनाथ मंदिरात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी कोकाटे बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, उपजिल्हाप्रमुख तात्यासाहेब गोडगे, माढा तालुका प्रमुख आनंद टोणपे, शेतकरी संघटना जिल्हाप्रमुख योगेश जाधव, माढा तालुका शेतकरी संघटना प्रमुख नागेश गायकवाड, तालुका वकील संघटना प्रमुख अॅड. दादा भोसले, कुर्डूवाडी शहर प्रमुख विकी भलानी, तालुका आरोग्य संघटना प्रमुख रोहन बलाकशे,सरपंच नाना खाताळ , सरपंच सुदर्शन गायकवाड, नगरसेवक आयुब मुलांनी,सज्जन ढवळे,किशोर बोरकर, विठ्ठल गायकवाड, तुकाराम पाटील, वैभव गायकवाड , प्रशांत महाडिक, अमोल ढगे ,नागेश काळे, आयुब पटेल, अण्णा ढवळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संजय कोकाटे म्हणाले की पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबवत आहेत. त्याच योजना घरोघरी पोहोचवून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी. पुढील काळात प्राथमिक सदस्य असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पक्षाच्या विविध पदावर काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.
शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष संघटनेचे जाळे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गाव तेथे शिवसेनेची शाखा काढून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त प्राथमिक सदस्य नोंदणी करून पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदे यांना गुरुपौर्णिमेची भेट द्यावी
0 Comments