Hot Posts

6/recent/ticker-posts

खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची एमएसआरडीसीसोबत विशेष बैठक

 खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची एमएसआरडीसीसोबत विशेष बैठक





अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील सोलापूर जिल्ह्यातील बावी, सोलंकरवाडी, बागेची वाडी, रोपळे, पिलीव, कुसमोड, काळमवाडी फाटा, उपरी, भाळवणी, वाकी, धोंडेवाडी तसेच सातारा जिल्ह्यातील म्हसवड, धुळदेव, मनकर्णवाडी येथील  अपूर्ण रस्ते, पूल यांचे कामे व दुरूस्ती रखडल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या वाढत असून, प्रवाशांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुंबई येथे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासोबत विशेष बैठक घेतली.

या बैठकीत स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. खासदार मोहिते पाटील यांनी अपूर्ण रस्ते व पुलांच्या कामाबाबत गंभीर दखल घेत कामांना तातडीने गती देण्याची स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिली.खराब रस्त्यांमुळे सोलापूर व सातारा जिल्ह्यांतील नागरिकांना दररोज अपघाताचा धोका आणि प्रवासात विलंब सहन करावा लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून तातडीने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे खासदार मोहिते पाटील यांनी बैठकीत अधोरेखित केले.

एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना खा.मोहिते-पाटील यांनी कामांसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले असून, स्थानिक प्रशासन व महामंडळामध्ये समन्वय ठेवून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही केले. याच बरोबर अपघात घडू नयेत म्हणून रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत,काही ठिकाणचे जमीन अधिग्रहणाचे मोबदले रखडलेले आहेत ते संबंधितांना देण्यात यावेत अशा ही सुचना खा.मोहिते-पाटील यांनी केल्या.

यावेळी महामंडळाकडून समस्येच्या निराकरणासाठी ठोस पावले उचलण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले
Reactions

Post a Comment

0 Comments