सत्तेचे 'लोणी''भाजप नेत्यांना पचेना'लोणीकरांनी घालवली पक्षाची प्रतिमा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिस्तबध्द पक्ष अशी स्वतःची प्रतिमा रंगवणार्या भाजपच्या नेत्यांना सत्तेचे 'लोणी'पचेनासे झाले असून वादग्रस्त वक्तव्यातून ते हे दाखवून देत आहेत. भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आगपाखड केली आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे असे वक्तव्य लोणीकर यांनी केले. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत असेही लोणीकर म्हणाले.
कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच असल्याचे लोणीकर म्हणाले.
जालना जिल्ह्यातील परतुर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी टीका केली आहे. दरम्यान बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
मागील काही दिवसापूर्वीच भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारांना इशारा देणारं वक्तव्य केलं होतं. जालना तालुक्यातील बोरगावमध्ये लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आठ कोटीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच उद्घाटन झालं. यावेळी भाषणात लोणीकरांनी गावकऱ्यानां हा इशारा दिला आहे. विधानसभेत लीड नसल्याने नाराज बबनराव लोणीकर यांनी ग्रामस्थांना कानपिचक्या दिल्या आहेत. जालना तालुक्यातील बोरगावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आठ कोटीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी लोणीकर बोलत होते. पाच वर्षाचे बलुतं, एक फुली द्या नाहीतर नका देऊ. तुम्ही मला नाही दिले तरी पाच दहा कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका असेही लोणीकर म्हणाले. मी एक दोन तीन वेळा पाहिल नंतर गावावर फुली मारील असा इशाराच त्यांनी गावकऱ्यांना दिला होता. त्यानंतर अशातच पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तुझ्या बापाला पेरणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रु दिल्याचे मोदींनी सांगितले.
स्वतःला जनतेचे मालक समजाणार्या लोणीकरांसारख्या नेत्यांच्या मानसीकतेमुळे भाजपची प्रतिमा मलीन होत असून सोज्वळतेचा मुखवटाही फाटत आहे.जनतेला विकासकामांना नीधी देणे म्हणजे त्यांच्यावर पीढ्यानपीढ्याचे उपकार करत असल्याचा आव आणणार्या नेत्यांना आपण जे राजेशाही जीवन जगतो ते ही जनतेच्याच पैशातून जगत असल्याचा विसर पडला आहे.अर्थात सत्तेचा माज उतरवण्याची धमकही जनताच दाखवत असल्याने अनेकांना तीने जमीनीवर आणले आहे.लोणीकरांचे 'लोणी'घुसळून 'ताक'कधी होईल हे त्यांना कळणारही नाही.
0 Comments