Hot Posts

6/recent/ticker-posts

लाखो भाविकांना मुख्यमंत्री सहाय्यता निवारा केंद्राचा आधार

 लाखो भाविकांना मुख्यमंत्री सहाय्यता निवारा केंद्राचा आधार




अकलूज (कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रे निमित्त संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज अकलूज सराटी फाटा येथे फुलांचा वर्षाव करीत स्वागत करणेत आले. जेसीबी मधून फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत जिल्हा प्रशासनाचे वतीने स्वागत करणेत आले. लाखो भाविकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निवारा केंद्राचा आधार घेतला.
सोलापूर जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्षाची उभारणी करणेत आली आहे.
राज्याच्या
ग्रामविकास व पंचायतराज विभागा कडून सर्व सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष घालून जिल्हा परिषदेची
यंत्रणा ताकदीने या कामा साठी लावली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शना खाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी नेटके नियोजन करून कमी कालावधीत व वेळेत वारकरी बांधवांसाठी निवारा केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. एकाच छताखाली निवारा केंद्र , भाविकांसाठी चरण सेवा (फुट मसाज) , आतील बाजूस वैद्यकीय उपचार केंद्र व बाजूस शौचालय व स्नानगृग व्यवस्था करणेत आलेली आहे.
हिरकणी कक्षात सर्व सुविधा देणेत आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी  निवारा केंद्रातील भाविकांची संवाद साधून सुविधांचाही माहिती दिली. भाविकांना योग्य सुविधा मिळतात का याची पाहणी करून सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी यांना सुचना दिल्या.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर जेसीबीने पुष्पवृष्ट्री करून स्वागत ..!

भल्या पहाटे निरा नदीत पादुकांना स्नान घालून जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात अकलूज हद्दीत आगमन झाले. जिल्हा परिषदेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून भाविकांचे स्वागत करणेत आले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद , मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर, जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, डाॅ. तेजस्वीनी जंगम प्रमुख उपस्थित होते.

लाखो भाविकांना मुख्यमंत्री निवारा केंद्राचा आधार..!
……………………..
पालखी मार्गावर मुक्काम व विश्रातींच्या ठिकाणी जर्मन हॅंगर व वाॅटर प्रमुख मंडप टाकून सुविधा केंद्र उभारणेत आली आहेत. सिईओ कुलदीप जंगम यांनी भाविकांना सुविधा बाबत आस्थेने विचारणा केलनंतर भाविकांनी प्रेमाचा वर्षाव केला. सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले. चालून थकलेल्या पायांना चरण सेवेचा आधार तर जमिनीवरील मॅट वर पाठ टेकवून गाढ झोपलेले भाविक विश्रांती घेताना दिसून येत होते. वृद्ध भाविक , महिला, लहान मुले यांना मुख्यमंत्री निवारा केंद्र आधार बनला आहे. एलईडी स्क्रीनवर भक्तीगिते, सुविधांची माहिती स्पिकरवरून देणेत येत आहे. शौचालयाची सुविधा बाजूस आहे. स्नानगृहाच्या
सुविधेमुळे चेंजीग रूम महिला वारकरी यांना आधार बनला आहे १७ दिवसांचा कालावधी घरा बाहेर राहिलेले भाविकांना मोबाईल बोलता यावे. चार्जिंग संपले कि चार्जिंग ची सोय देखील निवारा केंद्रात करणेत आली आहे.  १ लाख स्क्वेअर फुटाचा वाॅचरप्रुफ मंडप पाचही प्रमुख पालखी मार्गावर उभारणेत आलेले आहेत.

जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली शौचालयाची पाहणी ..!
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी देखील जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. सिईओ कुलदीप जंगम यांनी क्षेत्रीय स्तरावक सात ते आठ वेळा भेटी देऊन अंतीम स्वरूप येई पर्यंत कामाचा पाठपुरावा केला असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी आवर्जून सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments