Hot Posts

6/recent/ticker-posts

दोन दिवसाच्या उखाड्यानंतर नातेपुते शहरात पावसाचा जोरदार तडाखा

 दोन दिवसाच्या उखाड्यानंतर नातेपुते शहरात पावसाचा जोरदार तडाखा



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते शहरात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात उखाडा निर्माण झाला होता. उखाड्यामुळे नागरिक हैरान झाले होते. अवकाळीच्या विसावलेल्या पावसानंतर गुरुवार दिनांक १७ जूलै रोजी दिवसभरात भयंकर उष्णता निर्माण झाली होती त्यानंतर सायंकाळी ५:३० च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसास सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर बसणारे दुकानदार, फळभाजी विक्रेते यांची पडणाऱ्या पावसामुळे दाना दान झाली तर अचानक घराबाहेर पडणारे नागरिक पडणाऱ्या पावसापासून सुरक्षेसाठी मिळेल त्या ठिकाणी उभा राहण्यासाठी जागा शोधू लागली. रस्त्यावर सर्व ठिकाणी पाणी पाणी झाले होते. दोन दिवसाच्या उष्णतेच्या उखाड्यानंतर नंतर पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मात्र या पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा तसेच पालेभाज्या याचे मोठे नुकसान झाले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments