उपळाई खु येथील उत्कर्षा कदम यांची पर्यवेक्षकपदी निवड
माढा (कटूसत्य वृत्त):- उपळाई खु येथील रामभाऊ कदम यांच्यी कन्या उत्कर्षा कदम हिने सरळ सेवा अंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेतून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत पर्यवेक्षक या पदासाठी राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.तिचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा उपळाई खु येथे तर माध्यमिक शिक्षण गणपतराव साठे प्रशाला माढा येथे झाले आहे. त्यानंतर बीएस्सी पदवी पुणे विद्यापीठ येथून पूर्ण केले असून शिक्षण चालू असतानाच स्पर्धा परिक्षेची तयारी चालू केली होती. रामभाऊ कदम हे ग्रामसेवक तर आई गृहीणी आहे.तीव्र इच्छाशक्ती आणि अभ्यासामधील सातत्य यामुळेच मी हे यश संपादन केले आहे.असे तिने सांगितले .या यशाचे सर्व श्रेय आई वडिलांना दिले. तिने मिळविलेले यश हे अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे
सुरूवातीला अभ्यास सुरू करत असताना अनेक अडीअडचणींना व समस्यांना तोंड द्यावे लागले. त्या गोष्टींनी खचून न जाता अधिक जोमाने अभ्यास करुन तिने हे यश मिळविले आहे.त्यामुळे तिचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments