Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - रणजितसिंह नाईक-निंबाळकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - रणजितसिंह नाईक-निंबाळकर




सांगोला (कटूसत्य वृत्त):- आगामी निवडणुका तसेच बदललेल्या राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपने आता संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करत, त्या माध्यमातून आगामी निवडणुकासाठी तयारी सुरू केली आहे. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडूकी संदर्भात माळशिरस व माढा विधानसभेमध्ये मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राम सातपुते व जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थित कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडूकीत भाजप कार्यकर्ते यांनी गट तट बाजूला ठेवून एकादीलाने काम करावे असे अहवाहन रणजिसिंह नाईक निंबाळकर  यांनी कार्यकर्ते केले.
     जिल्ह्यातील आगामी निवडणुकीसाठी भाजपने माढा आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीवर जोर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच संघटनात्मक निवडी करण्यासाठी त्यानुसार माढा आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघात बैठका घेण्यात आल्या.
       यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, तळागातील लोकांमध्ये भाजपाचे ध्येय धोरण रुजविण्यासाठी पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी काम करावे. भाजप पक्षामध्ये पक्षसंघटनेला फार महत्त्व आहे. गावपातळीवरील कार्यकर्ता हा भाजपचा महत्त्वाचा दुवा आणि ताकद आहे. पक्षसंघटना बांधणीला सर्वाधिक महत्त्व असल्यामुळे त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पदे देऊन काम करण्याची संधी दिली जाते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षसंघटना वाढीसाठी आपला वेळ द्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले. 
यावेळी सचिन शिंदे, आप्पासाहेब देशमुख, बाळासाहेब सरगर, शरद मदने, राहुल पदमन, शशि कल्याणी, सोपानकाका नारनवर, हनुमंत सुळ, बाजीराव काटकर, माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहिते, नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख, अकलूज मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने-पाटील,
माढा पूर्व मंडल अध्यक्ष योगेश बोबडे, माढा पश्चिम मंडल अध्यक्ष योगेश पाटील, कुर्डुवाडी मंडल अध्यक्ष अविनाश गोरे, करकंब मंडल अध्यक्ष हर्षल कदम,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे, लक्ष्मण धनवडे, माऊली हळणवर, अनंत राऊत, दत्ता जाधव, उमेश पाटील, धनाजी लादे, अमरजितसिंह शेंडे, नंदकुमार मोरे, जयसिंग ढवळे, सौ. माया माने, सौ. सुनंदा भगत, सौ. स्वाती गोरे, सौ.आशा घाडगे,यांच्यासह भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा सेल आघाडी पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments