सोलापूर(कटूसत्य वृत्त):- उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरातील काही भागाला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. महिनाभरानंतर शहरातील उर्वरित भागांमध्ये पाच ऐवजी चार दिवसांआड पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाने शहरातील काही भागात १ जुलैपासून चार ऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवापासूनच शहरातील सुमारे, ४० टक्के भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत अर्धा तासाने कपात करण्यात आली आहे. चार ऐवजी साडेतीन तास पाणीपुरवठा केला जात आहे.
साधारणतः महिनाभर हा प्रयोग केला जाणार आहे. त्यानंतर शहरातील उर्वरित ६० टक्के भागात पाच ऐवजी चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात दिवस कमी करण्याचा येणार आहे. टप्प्याटप्प्याने एक
प्रयत्न होणार आहे.
शहरातील सिध्देश्वर पेठ, कुचन नगर, तेलंगी पाच्छा पेठ, राहुल गांधी झोपडपट्टी, पद्मशाली चौक, जमखंडी पूल परिसर, बुधवार बाजारचा काही भाग, सतनाम चौक, कुंभार गल्ली, १४ नंबर शाळा परिसर या परिसरात २६ जून रोजी पाणीपुरवठा झाला होता. या भागाला पुन्हा ३० जून रोजी पाणी देण्यात आले. या परिसरात पाणीपुरवठ्याचा पुढचा टप्प्पा ४ जुलै रोजी असणार आहे.
चौकट
एक दिवस कमी होईल : चौबे
शहरातील ज्या भागाला चार दिवसांआड पाणीपुरवठा आहे तिथे तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. त्याची अंमलबजावणी ३० जूनपासून करण्यात आली आहे. या प्रकारे टप्प्याटप्प्याने सर्व भागात एक दिवस कमी होईल, असे सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांनी सांगितले.
0 Comments