Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोल्यात ३८ ग्रामपंचायतींमध्ये येणार 'महिला राज'

 सांगोल्यात ३८ ग्रामपंचायतींमध्ये येणार 'महिला राज'

सांगोला (कटूसत्य वृत्त):- ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील तब्बल ७६ ग्रामपंचायतीच्या 'सरपंच' पदाच्या आरक्षणाची सोडत दि. १५ जुलै रोजी अहिल्यादेवी सभागृह सांगोला येथे तहसीलदार संतोष कणसे यांच्या उपस्थित झाली.


अनुसूचित जातीसाठी १६ ग्रामपंचायत, अनुसूचित जमातीसाठी १ ग्रामपंचायत तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २१, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३८ ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर झाले आहे. तसेच यामध्ये तब्बल ३८ ग्रामपंचायतमध्ये 'महिला 'कारभारी' असणार आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुक

उमेदवारांमध्ये 'कही खुशी, कही गम' असे चित्र पहावयास मिळाले.


अनुसूचित जाती प्रवर्ग-

गळवेवाडी (अनु. जाती स्त्री), राजापूर (अनु. जाती स्त्री), आगलावेवाडी (अनु. जाती स्त्री), भोपसेवाडी (अनु. जाती), बुरंगेवाडी (अनु. जाती), हणमंतगाव (अनु. जाती), खिलारवाडी (अनु. जाती), निजामपूर (अनु. जाती स्त्री), तरंगेवाडी (अनु. जाती), चिकमहुद (अनु. जाती स्त्री), राजुरी (अनु. जाती), नाझरे/सरगरवाडी (अनु. जाती स्त्री), लक्ष्मीनगर (अनु. जाती स्त्री), मांजरी/देवकतेवाडी (अनु. जाती), अजनाळे / लिगाडेवाडी (अनु. जाती), वाकी शिवणे (अनु. जाती स्त्री) तर अनुसूचित जमातीसाठी धायटी ग्रामपंचायत आरक्षित झाल्या आहेत.


नागरिकांचा मागास प्रवर्ग-

सोनंद (ना.मा.प्र. स्त्री), बामणी (ना.मा.प्र.), देवळे (ना.मा.प्र. स्त्री), ह. मंगेवाडी (ना.मा.प्र. स्त्री), हलदहीवडी ( ना.मा.प्र. स्त्री), कडलास (ना.मा.प्र.), संगेवाडी (ना.मा.प्र. स्त्री), पाचेगाव खुर्द (ना.मा.प्र.),

अचकदाणी (ना.मा.प्र.), अकोला (ना.मा.प्र.), बुद्धेहाळ- करांडेवाडी, (ना. मा.प्र.), एखतपूर (ना. मा. प्र.), गायगव्हाण (ना. मा. प्र. स्त्री), जवळा (ना. मा.प्र.), जुजारपूर / गुणापवाडी (ना. मा. प्र. स्त्री), लोणविरे (ना.मा.प्र. स्त्री), मानेगाव (ना.मा.प्र.), इटकी (ना.मा.प्र. स्त्री), बागलवाडी (ना.मा.प्र.), शिवणे (ना.मा.प्र.), सोनलवाडी (ना. मा. प्र. स्त्री) आरक्षित झाले आहेत.


सर्वसाधारण प्रवर्ग चोपडी (सर्वसाधारण), डिकसळ (सर्वसाधारण स्त्री), डोंगरगाव (सर्वसाधारण), घेरडी (सर्वसाधारण), हातीद (सर्वसाधारण), जुनोनी - काळुबाळुवाडी (सर्वसाधारण स्त्री), कमलापूर/गोडसेवाडी (सर्वसाधारण स्त्री), कटफळ (सर्वसाधारण स्त्री), किडबिसरी (सर्वसाधारण स्त्री), कोळा

(सर्वसाधारण), महुद बु (सर्वसाधारण), मेडशिंगी - बुरलेवाडी (सर्वसाधारण), मेथवडे (सर्वसाधारण स्त्री), नराळे (सर्वसाधारण), पाचेगाव बु. (सर्वसाधारण), पारे (सर्वसाधारण स्त्री), शिरभावी (सर्वसाधारण स्त्री), उदनवाडी ग्रुप (सर्वसाधारण), वाकी-घेरडी (सर्वसाधारण), वाटंबरे (सर्वसाधारण स्त्री), वझरे (सर्वसाधारण), य. मंगेवाडी (सर्वसाधारण स्त्री), वासुद-केदारवाडी (सर्वसाधारण), चिंचोली (सर्वसाधारण स्त्री), चिणके (सर्वसाधारण स्त्री), अनकढाळ (सर्वसाधारण), खवासपूर (सर्वसाधारण स्त्री), सावे (सर्वसाधारण स्त्री), बलवडी (सर्वसाधारण स्त्री), गौडवाडी (सर्वसाधारण), लोटेवाडी (सर्वसाधारण स्त्री), महिम (सर्वसाधारण स्त्री), सोमेवाडी (सर्वसाधारण स्त्री), तिप्पेहळ्ळी (सर्वसाधारण), वाणी चिंचाळे (सर्वसाधारण), आलेगाव (सर्वसाधारण), हंगरगे - गावडेवाडी (सर्वसाधारण स्त्री), वाढेगाव (सर्वसाधारण) असे आरक्षण घोषित करण्यात आले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments