जिल्हाधिकारी येत्या १८ ऑगस्टला अंतिम गण आणि गट रचनेचा आराखडा करणार जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रारूप गण व गट रचनेवर जवळपास १९ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींची सुनावणी ११ ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडे होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अंतिम गण व गट रचना जाहीर करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद गटाची गावे नगरपरिषदा व नगरपालिकामध्ये समाविष्ट झालेली आहेत. त्यामुळे त्या जिल्हा परिषद गटांची नावे बदलून नव्याने काही जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे गण निर्माण करण्यात आलेले आहेत. यामध्ये भौगोलिक परिस्थिती, कनेक्टिव्हिटी बाजारासाठी दळणवळण अशा गोष्टींचा विचार करून पंचायत समिती गण व जिल्हा परिषदेच्या गटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी या प्रारूप आराखड्यची रचना करून हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. तसेच याची त्या त्या तहसील अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढ्यात एकही हरकत नाही सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यातील गण व गट रचनेच्या प्रारूप आराखड्यावर एकही तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे या तालुक्यातील गण व गट रचना अंतिम स्वरूपाची मानली जात आहे. विभागीय आयुक्तांकडे होणार हरकतीची सुनावणी पातळीवर जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात आलेले आहे. मात्र यापैकी अनेक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणावर हरकती आल्या असून यामध्ये राजकीय हेतू ठेवून काही जिल्हा परिषद गटांच्या रचना झाल्या आहेत तर काही राजकीय पक्षांना प्रभावीत असलेली गावे गृहित धरून जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाची निर्मिती केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापैकी काही गावे वगळावीत किंवा ही गावे दुसऱ्या जिल्हा सर्वाधिक ८ तक्रारी करमाळा तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यामध्ये सर्वाधिक हरकती या करमाळा तालुक्यातून आल्या असून त्या ठिकाणी तब्बल आठ हरकती आल्या आहेत. त्यानंतर बार्शी, दक्षिण सोलापूर,पंढरपूर, मोहोळ या ठिकाणी प्रत्येकी दोन तर माळशिरस, उत्तर सोलापूर आणि माढा या तालुक्यात प्रत्येकी एक हरकत दाखल झालेली आहे.
परिषद गटाला जवळ पडत असताना दूरच्या जिल्हा परिषद गटाला का जोडली आहेत,अशा प्रकारच्या जवळपास १९ हरकती दाखल झालेल्या आहेत. या हरकतींवर आपला अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी येत्या २८ जुलैपर्यंत याचा अहवाल विभागीय आयुक्तांना देणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त ११ ऑगस्टपर्यंत आलेल्या हरकतींवर सुनावणी घेणार आहेत. त्यावर अंतिम निर्णय देणार आहेत. तो निर्णय झाल्यानंतर हा प्रारूप गट आणि गण रचनेचा आराखडा विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहेत. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्यावतीने अंतिम गण व गट रचना जाहीर केली जाणार आहे.
0 Comments