Hot Posts

6/recent/ticker-posts

खासदारपदी निवड झाल्याबद्दल अॅड. उज्ज्वल निकम यांचा सोलापूर बार असोसिएशनतर्फे सन्मान करण्यात आला.

 खासदारपदी निवड झाल्याबद्दल अॅड. उज्ज्वल निकम यांचा सोलापूर बार असोसिएशनतर्फे सन्मान करण्यात आला.




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ज्युनियर वकिलांना भविष्यात आपली प्रॅक्टिस चालेल का नाही याबद्दल भीती
असते. परंतु जीवनात आत्मविश्वास असेल तर काही अडचण येत नाही. सीनियर वकिलांनी सुद्धा ज्युनियर वकिलांना समजून त्यांना सहकार्य करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त खासदार अॅड.उज्ज्वल निकम यांनी केले. राष्ट्रपती यांच्या नामनिर्देशित खासदार पदासाठी
निवड झालेले पद्मश्री उज्ज्वल निकम यांचा सन्मान समारंभ सोलापूर बार असोसिएशन तर्फे सोमवारी करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना खा. अॅड.निकम हे बोलत होते.प्रारंभी ॲड. बाबासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक केले. अॅड.रियाज शेख यांनी परिचय करून दिला. तर अॅड. अरविंद देढे यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी अॅड. जाधव यांनी प्रास्ताविकेत खा. अॅड. निकम यांना कायदे मंत्री पदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.अॅड. राजेंद्र फताटे यांनी वकील संरक्षण हक्क कायदा व सोलापूरला खंडपीठ व्हावे, ही मागणी मनोगतातून केली. अॅड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या भाषणात नवोदित वकिलांना आदर्श ठरावे असे खा. अॅड. निकम यांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले.
देशातील मोठमोठ्या केसेस त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर जिंकल्या असल्याचे सांगितले. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग निश्चितच न्यायव्यवस्थेला होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या
कार्यक्रमास सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे, सहसचिव अॅड. मीरा प्रसाद,खजिनदार अॅड. अरविंद देढे, जिल्हा सरकारी वकील यांच्या प्रतिनिधी शीतल डोके यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी तसेच वकील उपस्थित होते.


चौकट
शासनाला या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करावे लागेल- अॅड. उज्ज्वल निकम

मुंबईच्या साखळी बॉम्ब स्फोटातील १२ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तब्बल १९ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे. ज्या पुराव्याच्या आधारे मुंबई सत्र न्यायालय शिक्षा ठोठावते, तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकत नसतील तर नेमकी चूक कुणाची? कायद्याचे विश्लेषण करताना चूक झाली,की यंत्रणेने चुकीचे पुरावे गोळा केले, याचे पोस्टमार्टम यथावकाश होईल.सरकारने देखील या निर्णयाचे अवलोकन केले पाहिजे. सरकारने न्यायालयाच्या या निर्णयाचा पूर्ण अभ्यास करून या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तात्काळ स्टे मागितला पाहिजे.

या निर्णयाविरोधात अपील करावे लागेल
बॉम्बस्फोटात अनेक निरपराध लोक मारले गेले आहेत. त्यामुळे आरोपींची
अशा पद्धतीने मुक्तता होणे, खटल्यातील पुराव्यांवर न्यायालयाने विश्वास न ठेवणे
हे अतिशय गंभीर आहे, असेही अॅड. उज्ज्वल निकम यांनी यावेळी सांगितले.


Reactions

Post a Comment

0 Comments