Hot Posts

6/recent/ticker-posts

राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी - दशरथ कांबळे

 राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी - दशरथ कांबळे




करमाळा (कटूसत्य वृत्त):- राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि विचार समस्त बहुजनांसाठी प्रेरणादायी आहेत. या विचारांनीच बहुजन समाजाचा उध्दार होणार आहे. अशा प्रकारचे उद्गार राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरातील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर न. प. शाळेतील कार्यक्रमात शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी काढले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमासाठी उपस्थित महिला पालक वर्गाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी एस.पी. कांबळे, एल.डी. कांबळे, ॲड. एम.डी. कांबळे, बौद्धाचार्य प्रशांत कांबळे, अशोक जाधव, लक्ष्मण भोसले, शालेय समितीचे अध्यक्ष शिलराज कांबळे, उपाध्यक्ष सौ. रणबागुल, दामोदरे, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, पत्रकार प्रशांत भोसले, पत्रकार विशाल परदेशी, पत्रकार विशाल जाधव तसेच शालेय समितीच्या सदस्यांनी व इतर ही पालक वर्गाने कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. 
          यावेळी कांबळे पुढे बोलताना म्हणाले कि, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत समस्त बहुजन बांधवांना सांगितले होते कि, राजर्षी शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करा. महाराजांनी शिक्षणाचे महत्व जाणून विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले होते. कारण अशिक्षित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे महाराजांनी चांगलेच हेरले होते. त्यामुळे महाराजांच्या विचारांवर आणि कार्यावर पाऊल ठेवून, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा आमचा छोटासा प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारचे विचार कांबळे यांनी मांडले.
           यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटपाचे नियोजन विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. तर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध स्पर्धांमध्ये उज्वल यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला. प्रशालेचे तत्कालीन मुख्याध्यापक राऊत यांची शहरातील इतर नगरपालिकेच्या प्रशालेत बदली झालेली आहे. त्या अनुषंगाने राऊत सर यांच्या कडून प्रशालेला एक प्रिंटर भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन बौद्धाचार्य प्रशांत कांबळे यांनी मानले. सदरचा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे जाधव, शेख मॅडम, राऊत इत्यादींनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments