Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यापीठाच्या चार अभिनव कल्पना भारताच्या एम.एस.एम.ई. आयडिया हेकाथॉन 4.0 मध्ये निवड - कुलगुरू महानवर

 विद्यापीठाच्या चार अभिनव कल्पना भारताच्या एम.एस.एम.ई. आयडिया हेकाथॉन 4.0 मध्ये निवड - कुलगुरू महानवर







सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अभिनव कल्पना या भारत सरकारच्या एम. एस. एम. इ. मंत्रालयाच्या माध्यमातून एम.एस.एम. इ. आयडिया हेकाथॉन का थोन 4.0 मध्ये एकूण देशभरातून तब्बल पंचवीस हजार कल्पना प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांच्या कल्पनांना संधी मिळाली असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी सांगितले.

देशभरातून तब्बल 25 हजार कल्पना प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी फक्त 488 कल्पनांची अंतिम निवड युथ श्रेणीत करण्यात आली होती. त्यामध्ये सोलापूर विद्यापीठाच्या 153 प्रस्तावा पैकी चार कल्पना निवडल्या गेल्या आहेत. म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर निवडी संदर्भात पाहिले असता सुमारे एक टक्का वाटा सोलापूर विद्यापीठाचा आहे.

पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले की हे यश विद्यापीठाच्या उद्यम प्रेरणा केंद्र द्वारे मिळवले गेलेले आहे. यात के. शाहणे यांनी गरम हवेवर आधारित दूध पाश्चरायझर. मुदस्सर सादिक इनामदार यांनी स्मार्ट वेल्डिंग मॉनिटरिंग सिस्टम, ज्योत्स्ना मदने यांनी बायोडिग्रेडेबल शेविंग कॅप्सूल तर अनिकेत काशिनाथ लोखंडे यांनी मेड होम टू युवर डोअर स्टेप या या कल्पनांचा समावेश आहे.

या अभिनव कल्पने कल्पना साकार होण्याकरिता केंद्र शासनाने एकूण 1.6 कोटींचा अनुदान मंजूर केलेला आहे. यापैकी या प्रत्येक कल्पनेस 15 लाखांचे अनुदान मिळणार असून विद्यापीठासाठी एक कोटीचे विशेष अनुदान प्लांट मशीनरी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर खरेदीसाठी मिळणार आहेत एकूण अनुदान रक्कम 1.6 कोटी एवढी आहे.

या अभिनव कल्पनेकरिता उद्यम प्रेरणा केंद्राचे सीईओ राजेश गुराणी यांनी विद्यापीठातील एकूण 153 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे प्रस्ताव राष्ट्रीय स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे सक्षम कार्य केले. असल्याचे कुलगुरू यांनी म्हटले आहे. या यशामध्ये योगदान देणाऱ्या सर्व मेंटर्स, इकोसिस्टम पार्टनर्स, विद्यापीठ प्रशासन सहयोगी अधिकारी व मार्गदर्शक मंडळींचे मनापासून आभार मानलेले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments