सर्व यंत्रणांनी गर्दी व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणालीचे काटेकोरपणे प्रशिक्षण घ्यावे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 20, 2025

सर्व यंत्रणांनी गर्दी व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणालीचे काटेकोरपणे प्रशिक्षण घ्यावे

 सर्व यंत्रणांनी गर्दी व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणालीचे काटेकोरपणे प्रशिक्षण घ्यावे


                                                                   - मोनिका सिंह ठाकुर
 
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर येथे सहा जुलै 2025 रोजी आषाढी यात्रा भरणार आहे आषाढी यात्रा कालावधी हा 26 जून ते 10 जुलै 2025 असा आहे या कालावधीत दहा ते पंधरा लाख वारकरी भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. त्या अनुषंगाने गर्दीचे व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणालीचे काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासन करत असते. या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले.
    जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गर्दी व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणाली बाबतच्या प्रशिक्षणात अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर मार्गदर्शन करत होत्या. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, छत्तीसगड येथील इमर्जन्सी अधिकारी विशाल वासवानी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सहाय्यक अधिकारी अर्चना बिसोई यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
      अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की दिनांक 26 जून ते 10 जुलै या कालावधीत आषाढी वारी पंढरपूर येथे होत असून या कालावधीत सुमारे पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात या यात्रेचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत केले जाते. व्यवस्थापनाच्या सुलभतेसाठी तसेच वारकरी भाविकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने घटना प्रतिसाद प्रणाली लागू केलेली आहे व जिल्ह्यात ही प्रणाली 2015 पासून राबवली जात असून सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांनी व त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी गर्दी व्यवस्थापन व घटना प्रतिसाद प्रणालीचे अत्यंत बारकाईने प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
      आषाढी वारी यात्रेतील गर्दीचे व्यवस्थापनाबाबत युनिसेफचे इमर्जन्सी ऑफिसर विशाल वासवानी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये आषाढी वारीत गर्दीचे व्यवस्थापन अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था, सुविधा आणि सेवा, आपत्कालीन नियोजन याबरोबरच कोणत्याही व्यवस्थापनातील यशासाठी महत्त्वपूर्ण घटक असलेला संपर्क या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. घटना प्रतिसाद प्रणाली आपत्तीजन्य परिस्थिती धोका कमी करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा आहे या प्रणालीद्वारे नियोजन सुयोग्य व सुलभ होते त्यासाठी आवश्यक कामकाजाचा लेखाजोगा ठेवणे व त्यानुसार कारवाई करणे अपेक्षित असते असे त्यांनी सांगितले.
    प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले यांनी या प्रशिक्षणाचा उद्देश सांगून आषाढी वारी मध्ये घटना प्रतिसाद प्रणालीचे महत्त्व सांगितले तसेच गर्दीचे व्यवस्थापन करताना या प्रशिक्षणातून खूप काही सर्वांना समजेल असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages