अभिनेञी माधुरी पवार यांचा कौतुकास्पद उपक्रम- दिगंबर काळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 20, 2025

अभिनेञी माधुरी पवार यांचा कौतुकास्पद उपक्रम- दिगंबर काळे

 अभिनेञी माधुरी पवार यांचा कौतुकास्पद उपक्रम- दिगंबर काळे



 
माढा (कटूसत्य वृत्त):- शक्ती बहुउद्देशिय संस्था कोंढवे जि.सातारा  यांच्या वतीने जि.प.शाळा मसोबावाडी(उपळाई बु) ता-माढा  येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश मुळे, संतोष शेंडे व बाबाजी गाडे यांच्या शुभहस्ते मोफत वह्या व शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.शक्ती बहुउद्देशिय संस्था ही गोरगरीब, वंचित ,कष्टकरी व गरजू सामाजासाठी नेहमीच मदत करीत आली आहे.शक्ती बहुउद्देशिय संस्थेचा यापुढेही अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग असेल असे संस्थेच्या संस्थापिका अभिनेञी माधुरी पवार यांनी सांगितले.दूरध्वनीद्वारे शाळेतील सर्व मुले-मुली यांच्याशी हितगुज केली.पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. अतिशय संघर्षातून पुढे आलेली अभिनेञी  माधुरी पवार यांनी आपल्याला मिळालेल्या मानधनातून संस्थेच्या माध्यमातून वंचित गोरगरीब व गरजू लोकांसाठी केलेले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.असे  केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी याप्रसंगी म्हटले .यावेळी उपाध्यक्ष प्रमोद खराडे,सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे,रामा कांबळे, सारिका रामा कांबळे संजय ढवळे, अनिल माळी ,संस्थेचे सदस्य  बाबाजी गाडे,सुर्यकांत उबाळे ,रणजित जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages