'दोन महिन्यांतच पालखीमार्गाला तडे'; वाखरीतील मार्गाचे काम निकृष्ट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 19, 2025

'दोन महिन्यांतच पालखीमार्गाला तडे'; वाखरीतील मार्गाचे काम निकृष्ट

 'दोन महिन्यांतच पालखीमार्गाला तडे'; वाखरीतील मार्गाचे काम निकृष्ट

ठेकेदारावर कारवाईची मागणी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- वाखरी ते पंढरपूर पालखीमार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अवघ्या दोन महिन्यांतच वाखरी येथे पालखीमार्गाला तडे गेले आहेत. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
मोहोळ ते आळंदी पालखीमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पंढरपूर ते वाखरी दरम्यानच्या आठ किलोमीटरचे काम सुरू आहे. कामास सुरवात होऊन दोन वर्षे झाली तरी अत्यंत संथगतीने हे काम सुरू आहे. काम सुरू झाल्यापासून कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. अशातच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयासमोर नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेलेआहेत.
अवघ्या दोन महिन्यांत सिमेंट रस्त्याला तडे गेल्याने कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. येथील मार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याला तडे गेल्याने स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, संबंधित बांधकाम करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार वाखरी ग्रामपंचायतीचे सदस्य संग्राम गायकवाड यांनी नॅशनल हायवेकडे केली आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी केशव घोडके यांच्याशी अनेक वेळा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
डागडुजीनंतरही पुन्हा खचला पुलाच्या बाजूचा भराव
शिवाय येथील पुलाच्या बाजूला टाकण्यात आलेला भरावही खचला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे येथील भराव खचला होता. त्यानंतर येथे डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतरही पुन्हा येथे भराव खचला आहे.
चौकट -
वाखरी-पंढरपूर पालखी महामार्गाला तडे गेल्याची माहिती मिळाली आहे. वारी काळात कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेतली जाईल. महामार्गाचे प्रकल्प अधिकारी केशव घोडके यांना याबाबत लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्या मी स्वतः या महामार्गाची पाहणी करणार आहे. वारीनंतर या कामाबाबत सविस्तर आढावा घेतला जाईल.
- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages