खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रेल्वेमार्गाच्या कामकाजाचा घेतला आढावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 24, 2025

खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रेल्वेमार्गाच्या कामकाजाचा घेतला आढावा

 खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रेल्वेमार्गाच्या कामकाजाचा घेतला आढावा



पुणे (कटूसत्य वृत्त):- पुणे आणि सोलापूर विभागातील रेल्वे संबंधित प्रश्नांवर मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे बैठक पार पडली. या बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील रेल्वे विकासाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

खासदार मोहिते-पाटील यांनी पंढरपूर-फलटण रेल्वेमार्गाच्या प्रगतीबाबत विचारणा केली. तसेच, पंढरपूर-देहू मेमू रेल्वे आणि दौंड-कुलबर्गी-दौंड दैनंदिन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. जेऊर-आष्टी रेल्वेमार्गाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉपच्या क्षमता वाढवण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय, सांगोला-दानापूर किसान रेल्वे, मोडनिंब कार्गो टर्मिनल उभारणी आणि कुर्डूवाडी येथील रेल्वे पोलीस ट्रेनिंग सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी जोरकसपणे मांडली.

या बैठकीस खा. सुप्रियाताई सुळे, खा. ओमराजे निंबाळकर, खा. निलेश लंके, खा. अमोल कोल्हे, खा. श्रीरंग बारणे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. मेधाताई कुलकर्णी, खा. विशाल पाटील, खा. रजनीताई पाटील, खा. नितीन पाटील, खा. शिवाजी काळूंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages