समाज कार्यात वहावून घेतलेले सुरवसे पाटील कुटूंब - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 24, 2025

समाज कार्यात वहावून घेतलेले सुरवसे पाटील कुटूंब

 समाज कार्यात वहावून घेतलेले सुरवसे पाटील कुटूंब



पुणे (कटूसत्य वृत्त):- राजकीय आणि सामाजिक पटलावर, मतांच्या राजकारणासाठी काहीजण समाजसेवा करताना दिसतील.परंतु  सुरवसे पाटील हे कुटुंब, ना मतांच्या राजकारणासाठी, ना जनतेला दाखवण्यासाठी, समाजसेवा करताना दिसणार नाहीत. कारण आपण प्रत्येकजण समस्त समाजाचे देणे लागतो, हा समस्त समाज माझा आहे.मानव ही जात माझी आहे आणि माणुसकी हा माझा धर्म आहे. हा उद्दात्त, निर्मळ आणि निःस्वार्थी हेतूची ज्यांनी स्वतःच्या हृदयात जपणूक केली आहे ते स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मा. प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांचे कुटुंब पुणे येथे पालखी सोहळ्यात, वैष्णवांना मायेचा घास भरवताना निदर्शनात आले.
    रोहन सुरवसे पाटील सारख्या युवकाने समाजासाठी अखंड आयुष्य पणाला लावले.समाज विकासात स्वतःला झोकून दिले, थोर महापुरुषांचा आदर्श आणि त्यांचे विचार मनाच्या गाभाऱ्यात साठवले आणि अत्यंत कमी वयात समाज कार्याचा प्रचंड मोठा ध्यास घेऊन, कर्तुत्वाचा आलेख गगनाला भिडवला.आज त्यांचे पूर्ण कुटुंब पालखी सोहळ्या मध्ये भक्तगणांची सेवा करत होते. रोहन सुरवसे पाटील यांची आई वडील, भाऊ भाऊजय, लहान चिमुकली मुले आणि स्वतः रोहन सुरवसे पाटील त्यांच्या पत्नी या सोहळ्यात निस्वार्थी अंतकरणाने वैष्णवांची सेवा करत होते.
          शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या पायथ्याशी वसलेल्या, माळशिरस तालुक्यातील, कोंडबावी गावातून रोहन सुरवसे पाटील यांनी लहान वयातच, समाजकार्याचा विडा उचलला होता.अत्यंत मनमिळावूपणा, सोज्वळता, नम्रता,  संयमता, उत्कृष्ट वाणी,सौजन्य आणि सहनशीलता या विविध गुणांमुळे रोहन सुरवसे पाटील यांच्या सानिध्यात महाराष्ट्र राज्यातला तमाम युवावर्ग आला आणि त्यांच्या सहकार्याने त्यांनी तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सुरू केले.
           सत्ताधीशांच्या आणि सत्ताधारी यांच्या मुलांना राजकारणात सहजतेने, संधी मिळते. परंतु कोणत्याही प्रकारचा कुटुंबात, राजकीय वारसा नसताना राजकारणात आणि समाजकारणात कर्तुत्व दाखवायचे म्हणले तर वाट्याला संघर्ष येतच असतो.रोहन सुरवसे पाटील यांनी समाज हितासाठी, त्यांच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करीत आहेत. समाज सेवेचे नवे पर्व, नवी दिशा आणि नवी आशा बाळगून उच्च विचारसरणी प्रकाशझोतात आणून त्यांनी स्वाभिमान जपला आहे.  ज्यांना अंतःकरणपूर्वक समाजहिताचे कार्य करायचे असेल तर त्यांना राजकारणाशिवाय पर्याय नसतो किंवा त्यासाठी राजकीय वारसदार असावे लागते. परंतु कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना, केवळ समाज आणि समाजहितासाठी, समाजसेवा करायची हा उद्देश ठेवून, रोहन सुरवसे- पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या, माध्यमातून दखलपात्र असेच समाजकार्य केली आहेत. त्यांनी केलेल्या कार्यामुळे, त्यांना दिल्ली तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील, संस्थेने  पुरस्कार देऊन गौरविले आहे.अशा कार्य कर्तृत्ववान युवा नेतृत्वाचे अखंड कुटुंबाचे जनतेतून कौतुक होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages