स्वामी समर्थ पालखी परिक्रमाची अन्नछत्र मंडळात सांगता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 28, 2025

स्वामी समर्थ पालखी परिक्रमाची अन्नछत्र मंडळात सांगता

 स्वामी समर्थ पालखी परिक्रमाची अन्नछत्र मंडळात सांगता

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या २७ वर्षांपासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येते. यंदाही महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यातून पालखी पादुकांची परिक्रमा होऊन गुरुवारी सायंकाळी अक्कलकोट अन्नछत्र मंडळात याची सांगता झाली.


या पालखीचे सोलापुरातून आगमन होताच अक्कलकोट मार्गावर असलेल्या विजय बाग पालखी विसावा येथे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले. या बरोबरच विजयव्हिला या फार्महाऊस येथे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, तेजस्विनीराजे भोसले, हर्षवर्धनराजे भोसले, स्वामिनी भोसले यांच्यासह हिरकणी संस्थेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी पालखीचे दर्शन घेऊन पूजन केले. त्यानंतर शहरातील खंडोबा मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पालखीचे आमगन होताच फटाक्यांची आतषबाजी करून श्री स्वामी समर्थ महाराज की जयचा जयघोष करण्यात आला. बुधवार पेठेतील समाधी मठ येथेही पालखीचे पूजन झाले. याप्रसंगी चोळप्पा महारांचे वंशज उपस्थित होते.


शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणुकीने पालखीचे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश  इंगळे, प्रथमेश इंगळे व पुरोहित मंदार पुजारी यांच्या उपस्थितीत आरती झाली. त्यानंतर अन्नछत्र मंडळात पालखी विसावली. यावेळी उपाध्यक्ष अमय खोबरे, सचिव श्यामराव मोरे, दत्तात्रय जाधव, विश्वस्त व पालखी पराक्रमाचे मुख्य संयोजक संतोष मोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, वैभव नवले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages