Hot Posts

6/recent/ticker-posts

स. महर्षि साखर कारखान्याचा प्रथम ॲडव्हान्स

 स. महर्षि साखर कारखान्याचा प्रथम ॲडव्हान्स



प्रती मे.टन रक्कम रु.200/- व अनुदान रक्कम रु.100/- बँकेत वर्ग

अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे सिझन 2024-2025 मध्ये दि.27/12/2024 अखेर गाळप झालेल्या ऊसास प्रती मे.टन रक्कम रु.2,600/- प्रमाणे तसेच दि.28/12/2024 पासून पुढे गळीत हंगाम बंद होईपर्यंत गाळप झालेल्या ऊसास प्रती मे.टन रक्कम रु.2,800/- प्रमाणे प्रथम ॲडव्हान्स रक्कम शासनाच्या धोरणानुसार ज्या-त्या पंधरवड्यामध्ये त्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आली आहे.
        गळीत हंगाम 2024-2025 मध्ये गळीतास आलेल्या ज्या सभासद, बिगर सभासद, दिर्घमुदत करारदार यांना प्रथम ॲडव्हान्स रक्कम रु.2,600/- दिला आहे त्यांना बैल पोळयासाठी प्रती मे.टन रक्कम रु.200/- व दिपावली सणाकरीता रक्कम रु.100/- आणि ज्यांना प्रती मे.टन रक्कम रु.2,800/- प्रमाणे प्रथम ॲडव्हान्स रक्कम अदा करणेत आला आहे त्यांना दिपावळी सणाकरीता प्रती मे.टन रक्कम रु.100/- तसेच दि.1/02/2025 चे पुढे गळीतास आलेल्या ऊसास प्रती मे.टन रक्कम रु.100/- इतके अनुदान द्यावयाचे धोरण ठरले आहे.
       तथापी, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस झाल्याने लागण हंगाम 2025-2026 (गळीत हंगाम 2026-27) करीता सभासद शेतकरी यांना नवीन ऊस लागवड, जमीन मशागत व खते खरेदी करणेसाठी पैशाची निकड लक्षात घेता संचालक मंडळाने दि.15 नोव्हेंबर 2024 ते दि.27 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रति मे.टन रक्कम रु.200/- प्रमाणे तसेच माहे-फेब्रुवारी 2025 पासून पुढे गळीत झालेल्या ऊसास प्रति मे.टन रक्कम रु.100/- इतकी अनुदान रक्कम दि.11/06/2025 रोजी यांचे बँक अकौंट वरती वर्ग करणेत आली असून दिपावली सणाकरीता प्रति मे.टन रक्कम रु.100/- असा एकुण रक्कम रु.2,900/- प्रति मे.टन ऊस दर देण्यात येणार असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली.
     कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
गळीत हंगाम 2024-2025 मध्ये सभासद, बिगर सभासद, दिर्घमुदत करारदार यांच्या गळीतास आलेल्या ऊसाची बिले शासनाच्या धोरणानुसार ज्या-त्या पंधरवड्यामध्ये त्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आली असून ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांची ऊस तोडणी वाहतूकीची संपुर्ण बिले दि.22/03/2025 रोजी तसेच वाटखर्ची व डिपॉझीट रक्कम दि.26/05/2025 रोजी बँक खातेवर वर्ग करणेत आली आहे.
गळीत हंगाम 2025-2026 चालू करण्याचे दृष्टीने कारखाना व इतर उपपदार्थ प्रकल्पाकडील ओव्हर हॉलिंगची कामे प्रगतीपथावर असून शेती विभागामार्फत ऊस तोडणी वाहतूकीचे वाहन करार सुरू असून सदर हंगामामध्ये 10 लाख मे.टन ऊस गाळप करणेचे उद्दीष्ट ठेवले असून कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व बिगर सभासद यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
    सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक - रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक - पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, कालीदास मिसाळ, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ.हर्षाली निंबाळकर, श्रीमती पुष्पा महाडीक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments