अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 13, 2025

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक

 अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खरेदी दस्तावरून सात-बारावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती तीन हजार रुपये घेताना अक्कलकोट मधील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधविभागाने रंगेहाथ पकडले फिर्यादींनी दोन जूनला दस्तानुसार अक्कलकोट येथील गट क्र 54/4/ब मधील एक हेक्टर जमीन खरेदी केली.

या खरेदीवरून सात-बारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अरुण मारुती शेवाळे (रा. अक्कलकोट, मूळ गाव पुणे शहर) यांच्याकडे रीतसर कागदपत्रे दिली. नोंद उतार्‍यावर घेण्यासाठी शेवाळे यांनी फिर्यादीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. फिर्यादींनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर शेवाळे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages