Hot Posts

6/recent/ticker-posts

उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत सोलापुरात शनिवारी अमृतवेल बिजनेस स्टॉक शो

 उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत सोलापुरात शनिवारी अमृतवेल बिजनेस स्टॉक शो

 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उद्योग आणि उद्योजकता विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी अमृतवेल फाउंडेशन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रमोद साठे ग्रुप यांच्या वतीने  शनिवार दि. 14 जून 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिर येथे "अमृतवेल बिजनेस स्टॉक शो" या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, प्रेरणादायी वक्ते सुरेश हावरे आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. "उद्योगावर बोलू काही" या विषयावर वक्ते सुरेश हावरे हे मार्गदर्शन करणार आहेत. उद्योजक, व्यावसायिक, नव उद्योजक आणि उद्योगांमध्ये येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमृतवेल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र पवार यांनी केले आहे.
      या पत्रकार परिषदेस निमंत्रक मुकुंद हिंगणे उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments