कुमठे कनिष्ठ महाविद्यालय कुमठे येथे छत्रपती शाहू महाराजांची जयंती संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 27, 2025

कुमठे कनिष्ठ महाविद्यालय कुमठे येथे छत्रपती शाहू महाराजांची जयंती संपन्न

 कुमठे कनिष्ठ महाविद्यालय कुमठे येथे छत्रपती शाहू महाराजांची जयंती संपन्न



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये छत्रपती शाहू महाराजांची 151 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. हणमंत शिंदे  व प्रमुख वक्ते प्रा. दादाराव डांगे होते.
                                                 
            राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने बहुजनांचे राजे होते. त्यांनी बहुजनांसाठी खूप मोठे कार्य केलेले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी  शाळेची स्थापना केली. त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजना ही चालू केली. त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांसाठी व शेतकऱ्यांसाठी त्यांची कार्य हे बहुमोल आहे. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ब्रह्मदेवदादा माने यांचे हे कार्य छत्रपती राजर्षी  शाहू महाराज महाराजांच्या विचारावर आधारित होते  असे प्रतिपादन प्रा. दादाराव डांगे यांनी व्यक्त केले. प्रा. हणमंत शिंदे यांनी छत्रपती राजर्षी  शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. संजय जाधव, प्रा. दीपक शिंदे, प्रा. विजयकुमार वाळके पाटील, प्रा. विनोद थोरात, प्रा. राजीव निकम व प्रा. बंडोपंत बाबर उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages