कोर्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 19, 2025

कोर्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न

 कोर्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न

 

     पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मौजे कोर्टी, ता. पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ४६७ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
 
          महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांची निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे. तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी कोर्टी, ता. पंढरपूर येथे शिबीराचे  आयोजन करण्यात आले होते.
 
             आमदार समाधान आवताडे,प्रांताधिकारी सचिन इथापे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधिक लाभांचे वाटप करण्यात आले. सदर शिबीरात महसूल विभागाच्या ३०६ लाभार्थ्यांनी   उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉनक्रिमिलेयर दाखले, वय व अधिवास दाखले तसेच  चार इतर दाखले आदी योजनांचा लाभ घेतला त्याचबरोबर पुरवठा विभागाकडून ५१शिधापत्रिका ,त्याचबरोबर  कृषी विभागाकडून १७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. कोर्टी ग्रामपंचायतीकडून १४ घरकुले व १० जॉबकार्डचा लाभ देण्यात आला. आरोग्य विभागाच्या माध्यमातून ६४ तर लेक लाडकी योजनेतून 5 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
 
           सदर शिबीरात शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच प्रशासनाची सेवा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले असल्याची माहिती तहसिलदार लंगुटे यांनी दिली.
          या शिबीरास गटविकास अधिकारी सुशील संसारे,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, महिला व बालकल्याण विकास अधिकारी समाधान नागणे, तालुका कृषी अधिकारी श्री मोरे  तसेच ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages