पोलीस अधिकाऱ्यांकडून पालखी मार्गाची पाहणी, सोळाशे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 19, 2025

पोलीस अधिकाऱ्यांकडून पालखी मार्गाची पाहणी, सोळाशे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 पोलीस अधिकाऱ्यांकडून पालखी मार्गाची पाहणी, सोळाशे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा सरहद्द नातेपुते येथे श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ३० जून रोजी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते याठिकाणी असणार आहे. त्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची पाहणी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर, नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनी महारुद्र परजणे यानी धर्मपुरी स्वागत, कारुंडे विसावा, मोरोची, जिजाऊ चौक, शिखर शिंगणापूर चौक पानस्कर वस्ती विसावा या महामार्गावरील वाहतूक यांची पहाणी करून आवश्यकतेनुसार नाकाबंदी व बंदोबस्त लावण्याचे नियोजन केले आहे.
पालखी नातेपुते मुक्कामी आल्यानंतर या मार्गावर फोंडशिरस चौक, अण्णा भाऊ साठे चौक, शिंगणापूर पाटी येथील जिजाऊ चौक या ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. पालखी तळावर कडेकोट बंदोबस्त ठेवून अनेकांच्या हालचालीवर सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. सोलापूर जिल्हा सरहद्द धर्मपुरी पासून ते शिखर शिंगणापूर पाटील विसावा व नातेपुते मुक्कामाच्या ठिकाण वरील संपूर्ण पाहणी करून संबंधित पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांना पालखी सोहळा बंदोबस्ताच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पालखी मार्ग पाहणी दौऱ्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर, नातेपुते पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलिस उपनिरीक्षक किशोर तनपुरे, अशोक खाडे, युवराज कणसे, महेश जाधव, संतोष वारे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

चौकटीत :
पालखी सोहळ्यासाठी १६०० कर्मचारी बंदोबस्तात असून ४०० होमगार्ड, १०५० पोलिस, १५० अधिकारी तैनात केले आहेत. तसेच वॉटर फिलिंग पॉईट, सोहळा मार्ग, पालखी क्रॉसिंग पॉईट, याठिकाणीही बंदोबस्तात वाढ केली असून वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, तसेच अपघातमुक्त वारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाळणे खेळणी मनोरंजन ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे. महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून ठिकठिकाणी गर्दीच्या ठिकाणी महिला पोलिसांची नेमणूक केली असून गर्दीमध्ये चोरी होऊ नये म्हणून वारकऱ्यांच्या वेशभूषेत पोलीस गर्दीत नजर ठेवून असणार आहेत

          महारुद्र परजणे 
( सहाय्यक पोलीस निरीक्षक, नातेपुते पोलीस ठाणे )

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages