आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- गणेश निराळी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 19, 2025

आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- गणेश निराळी

 आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- गणेश निराळी




सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- निरोगी आरोग्यासाठी ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सोलापुरकरानी सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी योग दिवस समन्वय समितीच्या बैठकीत केले.

        केंद्रीय संचार ब्यूरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, योग दिवस समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासन, सोलापूर यांच्या वतीने २१ जून रोजी साजरा होणा-या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निराळी बोलत होते.

        यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, तहसीलदार श्रीकांत पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, योग समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा आणि आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

        अंबादास यादव म्हणाले की, २१ जून हा आंतरराष्‍ट्रीय योग दिन म्‍हणून जागतिक स्‍तरावर मोठया प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी देशभर एक लाख ठिकाणी ‘योग संगम’ साजरा करण्‍यात येत आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने भारत सरकारची सर्व मंत्रालयाने उत्‍सफुर्तपणे सहभाग घेउन रोज ‘कॉमन योग प्रोटोकॉल’ प्रमाणे सराव करत आहेत. एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ही यावर्षीची संकल्पना आहे. यावर्षीचा हा अकरावा आंतरराष्‍ट्रीय योग दिन हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर दि. २१ जून २०२५ रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत साजरा करण्यात येणार आहे. केंद्रिय संचार ब्युरोच्या वतीने दिनांक १९ ते २० जून पर्यंत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहामध्ये मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये भारतीय योग, विविध योगासने, प्राणायाम, ध्यान याविषयी माहिती देणारे चित्र व मजकुरासह लोकांना बघता येणार आहे. सदर प्रदर्शन सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

         या बैठकीसाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, नायब तहसिलदार एस सी परदेशीमठ, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, राज्य राखीव दलाचे सहायक समादेशक एम एच मते, जिल्हा होमगार्डचे मळसिद्ध कोकरे, मुख्य क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड, संचालक राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ राजेंद्र वडजे, सोलापूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, भारत स्काऊट गाईड संघटक अनुसया शिरसाठ, श्रीधर मोरे, पतंजली योग पीठचे रघुनंदन भुतडा, रघुनंदन बनसोडे, विवेकानंद केंद्राचे रवी कंटली, महेश गोंजारी, योग साधना मंडळचे रोहिणी उपळाईकर, भारतीय योग संस्‍थाचे दत्तात्रय चिवडशेट्टी, गीतापरिवार सर्व कल्‍याण योगचे संगीता जाधव, सर्वोदय योग मंडळाचे जीवनकुमार अवताडे इत्यादी अधिकारी आणि योग संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages