उमेश पाटलांवर सोलापूर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यपदाची धुरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 18, 2025

उमेश पाटलांवर सोलापूर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यपदाची धुरा

 उमेश पाटलांवर सोलापूर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यपदाची धुरा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश पाटील यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल सात महिन्यांनंतर नवा कॅप्टन मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा, तसे पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. जिल्हाध्यक्षपदासाठी उमेश पाटील यांच्यासोबतच अनेक नावे चर्चेत होती. अनेकांनी जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा बोलून दाखवली होती. अनेकांची इच्छा असूनही अजितदादांनी थेट नकार दिल्याने त्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांच्या खांद्यावर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही. पक्षाचा आमदार नसला तरी सोलापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती. त्यात जिल्हा परिषदेपासून बहुतांश पंचायत समित्यांवरही पक्षाचा झेंडा होता. मात्र, मागील निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऐवजी जनतेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देणे पसंत केले होते, त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत सोलापुरात एकही जागा मिळू शकलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचे मोठे आव्हान उमेश पाटील यांच्यापुढे असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages