Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- राज्य पातळीवर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाची महायुती असली तरी अक्कलकोट तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक भाजपने स्वबळावर लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून धरला जात आहे.


याच पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना कार्यकर्त्यांकडून स्वबळाच्या भूमिकेसाठी साकडे घालण्यात येत असून आमदार कल्याणशेट्टी यांनी देखील अशा संकेतांमधून पक्षाच्या स्वतंत्र लढतीची शक्यता अधिकच बळकट केली आहे. माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे स्थानिक पातळीवर युती कायम राहणार का अशी चर्चा केली जात होती. मात्र, आमदार कल्याणशेट्टी यांच्या स्वबळाच्या सूचक विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, अनेकांना यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. आमदार कल्याणशेट्टी कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून माझे संपूर्ण लक्ष अक्कलकोट तालुक्यातील विकासाकडेच राहील, असेही त्यांनी नमूद केले. 


भाजप कार्यकर्ते स्थानिक पातळीवरील राजकीय  समीकरणांमध्ये कोणतीही तडजोड न करता पक्षाची ताकद सिध्द करावी, अशी भूमिका घेत आहेत. यामुळे अक्कलकोटमध्ये महायुतीऐवजी भाजप स्वबळावर रिंगणात उतरणा आहे हे प्रकर्षांने दिसत आहे. आत पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments