उत्पन्न वाढलेल्यांनी अन्नधान्य योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 24, 2025

उत्पन्न वाढलेल्यांनी अन्नधान्य योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडावा

 उत्पन्न वाढलेल्यांनी अन्नधान्य योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडावा

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):-  तालुक्यात सवलतीच्या दरात मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याचा लाभ ज्या कार्डधारकांचे उत्पन्न वाढले आहे त्यांनी आता स्वेच्छेने सोडावा व योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार संतोष कणसे यांनी कार्डधारकांना केले आहे.


राज्य शासनाने गोरगरीब नागरिकांची परिस्थिती ओळखून त्यांना १९९६ पासून रास्तभाव धान्य दुकानातून निर्धारित केलेले कार्डधारक अंत्योदय, बी.पी.एल., ए.पी.एल. असे संवर्ग करुन सवलतीच्या दरात अन्यधान्य विक्री केली जात असे. २०१४ साली अन्नधान्य वितरण सुरक्षा कायदा मंजूर झाला असून त्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंबे असे संवर्ग करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा कायद्यानुसार ग्रामीण भागात ४४ हजार रुपये तर शहरी भागात ५९ हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा निश्चित यासाठी केली आहे. वरील बाबींचा विचार करता अनेक कुटुंबे १९९६ पासून सवलतीच्या दराने धान्याचा लाभ घेत आहेत.


दरम्यान, २०२४ नंतर मंगळवेढा तालुक्यातील बऱ्यापैकी लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. काही कुटुंबांकडे चार चाकी वाहने आहेत. तसेच खासगी व सरकारी मोठ्या पगाराच्या नोकरीवर आहेत. काही शेतकरी बागायतदार असल्याचेही दिसून येत असून अशा शिधापत्रिकाधारकांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्यांनी अन्नधान्याच्या अनुदान योजना सोडणे आवश्यक आहे. असे लाभधारक धान्य घेणे सोडत नसल्याने २०२४ पासून नवीन इस्टांकानुसार शासनाकडे मागणी करुन अद्यापपर्यंत ते प्राप्त न झाल्याने खऱ्या लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेत लाभ देता येत नाही.


 चौकट

शासनास सहकार्य करावे

ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहने तसेच दोन एकरापेक्षा जास्त जमीन बागायत आहे. त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्ती खासगी कंपनी अथवा शासकीय नोकरीस आहे. ज्यांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे. अशा सर्व कार्डधारकांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडून शासनास सहकार्य करावे..

संतोष कणसे

प्रभारी तहसीलदार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages