ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश स्कूलचा वर्धापन दिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 25, 2025

ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश स्कूलचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश स्कूलचा वर्धापन दिन उत्साहात साजरा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेचा 15 वा वर्धापन दिन सोमवार 23 जून रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिजमोहन फोफलिया उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन चव्हाण विराजमान होते, तर संस्थेच्या सचिवा ज्योती चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने करण्यात आली. शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत मुख्याध्यापिका उर्मिला कटप यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.

कार्यक्रमात दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. दहावीचा शंभर टक्के रिझल्ट अनेक वर्षापासून लागत आहे  विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
या शाळांमध्ये आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, आणि क्रीडांगणे, बेसिक संगणक प्रशिक्षण व ई-लर्निंग वर्ग.यांसारख्या सुविधा उपलब्ध असतात.क्रीडा, कला, संगीत, आणि इतर ॲक्टिव्हिटीजसाठी या शाळांमध्ये विशेष संधी उपलब्ध असतात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका आसिया शेख आणि सविता सावंत यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages