उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पर्यावरणाचे संरक्षण हे रोटरी ६ इंटरनॅशनलच्या सात प्रमुख कार्यक्षेत्रांपैकी एक असून, या उद्दिष्टाशी सुसंगत राहून रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांनी गुळवंची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. रोटरी क्लबच्यावतीने ५०० वृक्ष लागवड मोहिमेचा पहिला टप्पा दि. २२ जून २०२५ रोजी गुळवंची येथे १०० झाडांची लागवड करून पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका वनाधिकारी सचिन जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष अकबर
नदाफ, सचिव बसवराज बिराजदार, योगीनाथ कुडते, महेश साळुंके, नागेश शेंडगे, सत्यम दुधनकर, शहाजी भोसले, विष्णू भोसले, धनाजी भोसले, महेश नवगिरे, सोमनाथ भोसले, सुहास भोसले, विक्रम जगताप, सागर तांबे, राहुल पांढरे आदी ग्रामस्थ आणि छावा प्रतिष्ठानचे सदस्य यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment