माढा नगरपंचायतीच्या वतीने वटपौर्णिमा वेगळ्या संकल्पनेतून साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 13, 2025

माढा नगरपंचायतीच्या वतीने वटपौर्णिमा वेगळ्या संकल्पनेतून साजरी

 माढा नगरपंचायतीच्या वतीने वटपौर्णिमा वेगळ्या संकल्पनेतून साजरी



माढा (कटूसत्य वृत्त):- माढा नगरपंचायतीच्या वतीने मा नगरध्यक्षा अॅड सौ.मीनलताई साठे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी नेहा कंठे यांच्या उपस्थितीत यावर्षीचे वटपौर्णिमा ही एका वेगळ्या संकल्पनेतून साजरी करण्यात आली यामध्ये माढा शहरातील प्रियदर्शनी महिला मंडळ,सौ. मीनलताई साठे महिला बचत गट, जिजाऊ महिला बचत गट, शिवपार्वती महिला बचत गट व माढेश्वरी महिला बचत गट या बचतगटांना प्रत्येकी १०  प्रमाणे एकूण ५० वडाच्या वृक्षाचे वाटप करण्यात आले. व त्यांना वृक्ष लागवडी पासून ते संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी महिला मंडळास  देण्यात आली. यावेळी  नगरध्यक्षा मीनलताई साठे यांनी आपल्या  अध्यक्षीय भाषणातुन गेली 10 वर्षांपासून वटपौर्णिमाच्या निमित्ताने वड वृक्ष लागवडीचा सामाजिक उपक्रम प्रियदर्शनी महिला मंडळामार्फत माढा शहरात राबविण्यात येत असल्याची माहिती दिली .तसेच बचत गटातील प्रत्येक महिलांनी  आपल्या मुला प्रमाणे या वृक्षाची जोपासणा करून प्रत्येकी ०१ वृक्षाला  स्वतःच किंवा कुटुंबाच नाव देण्यास सांगितले . त्याचबरोबर प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो हे मनोगतात त्यांनी सांगितले. व माढा शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत  जास्तीत जास्त वृक्ष लाऊन  आपण आपल्या निसर्गाचे ऋणी राहिले पाहिजे. एवढे बोलून भाषणाची सांगता केली. तसेच माढा शहरातील महिलांनी जास्तीत जास्त वृक्षाचे संगोपन करण्यास मा. मुख्याधिकारी नेहा कंठे यांनी सांगितले .त्यावेळी मा. नगरध्यक्षा अॅड सौ.मीनलताई साठे , मुख्याधिकारी नेहा कंठे,महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. रेश्मा लंकेश्वर , आरोग्य सभापती सौ. मोहिनी नेटके. माजी नगरसेविका सौ.गीतांजली देशमुख शहर समन्वयक आरती सुरवसे त्याचबरोबर प्रियदर्शनी महिला मंडळ,सौ. मीनलताई साठे महिला बचत गट, 
जिजाऊ महिला बचत गट, शिवपार्वती महिला बचत गट या बचतगटातील अध्यक्षा, उपाध्यक्षा,सचिव, तसेच सदस्या व माढा नगरपंचायत चे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages