पर्यावरणस्नेहींनी बनवले हजारो सीडबॉल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 2, 2025

पर्यावरणस्नेहींनी बनवले हजारो सीडबॉल

 पर्यावरणस्नेहींनी बनवले हजारो सीडबॉल




पर्यावरण दिनानिमित्त महापालिका पर्यावरण विभाग आणि इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लहान मुले, पालक, महाविद्यालयीन तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांनी सीड बॉल बनविण्याच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग आणि इको फ्रेंडली क्लब यांच्यावतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे सीड बॉल (बीज गोळे) बनवण्याचा उपक्रम आयोजित केला होता.

सुरुवातीला काळी माती एकजीव करण्यात आली. त्यात देशी झाडांच्या बिया घालून बॉलसारखे छोटे गोळे तयार करण्यात आले. वसुंधरा मित्र, इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी सीड बॉल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

वाळलेले सीड बॉल सायकलिंग, निसर्ग भ्रमंती, ट्रेकींग आणि सहलीदरम्यान टाकण्यात येणार आहेत. हे सीड बॉल फुटून बियांना अंकुर येईल आणि त्या रोपांचे झाडात रुपांतर होईल, अशी ही संकल्पना आहे. 

दोन तासात हजारो सीड बॉल बनवण्यात आले. सोलापूर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, पर्यावरण व्यवस्थापक स्वप्निल सोलनकर, उद्यान विभागातील कर्मचारी दिलीप भामरे, मछिंद्र गेजगे, वैष्णव दांडगे यांनी सीड बॉल कार्यशाळेत सहभाग नोंदवून पर्यावरणप्रेमींना प्रोत्साहन दिले.

या उपक्रमात इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित  कोकणे, सदस्य संजय टोळे, दर्शन जाधव, सुरेश नारायणकर, गंगुबाई कोकणे, आराध्या कोकणे, ॲड. साधना काकडे, डॉ. मधुरा बुरटे, शैलजा घाटे, डॉ. हर्षदा आगलावे, स्नेहा क्षीरसागर, अस्मय क्षीरसागर, शुभदा कडगावकर, सरस्वती कोकणे, पूजा कोकणे, धनंजय कांबळे, शशिकला कांबळे, अर्चना जमादार, रश्मी पात्रुडकर, सर्वेश गावंडे, रणजीत होले पाटील, पर्यावरणप्रेमी संतोष धाकपाडे, वीरभद्र स्वामी, वैष्णव दांडगे, राजकुमार कोळी, भारतीय डाक विभागातील श्रीरंग रेगोटी,  वैद्य प्रवीण बिरगे, साची माळी, इरा नारायणकर, राई नारायणकर, वीर नारायणकर, विश्वराज कोळी, सृष्टी कोळी, विजयालक्ष्मी कोळी, व्यंकटेश यांच्यासह विविध क्षेत्रातील निसर्गप्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages