छत्रपती शाहू महाराज हे समतेचे पुरस्कर्ते व न्यायप्रिय राजे होते - तुकाराम कापसे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 27, 2025

छत्रपती शाहू महाराज हे समतेचे पुरस्कर्ते व न्यायप्रिय राजे होते - तुकाराम कापसे

 छत्रपती शाहू महाराज हे समतेचे पुरस्कर्ते व न्यायप्रिय राजे होते - तुकाराम कापसे 



माढा (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शाहू महाराजांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले.त्यांनी सर्व समाजाच्या तळागाळातील व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व वसतीगृहांची सोय केली.त्यांनी कोल्हापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी राधानगरी धरण बांधून शेतीसाठी जलसिंचनाच्या विविध योजना राबविल्या. त्यांच्या राज्यात त्यांनी कधीही कोणावर अन्याय होऊ दिला नाही. त्यांनी अंधश्रद्धा,रुढी,अनिष्ठ प्रथा व परंपरा यांना कडाडून विरोध केला.ते समतेचे पुरस्कर्ते व न्यायप्रिय राजे होते म्हणूनच त्यांची जयंती सर्वत्र सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षक तुकाराम कापसे यांनी केले आहे.

ते आनंदनगर मानेगाव ता.माढा येथे श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी 26 जून रोजी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक विद्यार्थिनी अस्मिता लटके हिने केले. 
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी विद्यार्थिनी अनुष्का कापसे,सृष्टी खोत,स्नेहा खोत,वैष्णवी खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन विद्यार्थिनी आरती पवार हिने केले.आभार श्रुती घोगरे हिने मानले.

यावेळी प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके,सांस्कृतिक विभागप्रमुख तनुजा तांबोळी, शिवाजी भोगे,सचिन क्षीरसागर, सुनील खोत,सुधीर टोणगे,लहू गवळी,सागर राजगुरू यांच्यासह विद्यालयातील 5 वी ते 10 वीचे विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages