सर्व पालखी मार्गावर सुविधा दर्शविणारे सुचना फलक - सिईओ जंगम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 27, 2025

सर्व पालखी मार्गावर सुविधा दर्शविणारे सुचना फलक - सिईओ जंगम

 सर्व पालखी मार्गावर सुविधा दर्शविणारे सुचना फलक - सिईओ जंगम


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- धर्मपुरी ते वाखरी हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर पायपीट करीत जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी भाविकांच्या सुविधांच्या तयारीची अंतीम पाहणी केली. पालखी मार्गावर एकाच रंगात दिशादर्शक फलक ठेवणेत येत असल्याचे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले. 
आज पंढरपूर तालुक्यातील वाखरी, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वेळापूर, खुडूस, कारूंडे बंगला परिसर , धर्मपुरी येथील स्वागताच्या ठिकाणी जाऊन सिईओ कुलदीपव जंगम यांनी शौचालय व्यवस्था, प्लास्टिक व्यवस्थापन, निवारा व्यवस्था व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली. 

जिल्ह्यातील दहा पालखी मार्गावर एकाच आकारातील सुचना फलक

सोलापूर जिल्ह्यात येणारे दहा प्रमुख पालखी मार्गावर एकाच आकारातील विविध दहा प्रकारच्या सुचना फलक दिसणार आहेत. वारकरी यांना लगेच समजावे यासाठी स्वत सिईओ कुलदीप जंगम यांनी डिझाईन बनवून घेतले आहे. 
पालखी मार्गावर दर्शनी भागात उंच ठिकाणी हे फलक भाविकांच्या लक्ष जाईल अशा ठिकाणी ह् फलक लावणेत येत आहेत. हे फलक लावणेची जबाबदारी पालखी मार्गावरील ग्रामपंचातींना देणेत आली आहे. 
महिला व पुरूषा साठी शौचालय, पिण्याचे पाणी, प्लास्टिक व्यवस्थापन, स्नानगृह, निवारा शेड, हिरकणी कक्ष, चार्जींग स्टेशन , चरण सेवा, या सह विविध सुचना फलक तयार करणेत आले आहं. 
दर्शनी भागात ज्या
ठिकाणी सुविधा देणेत आले आहेत अशा ठिकाणी दिशा दर्शविणारे हे फलक बसविणेत आले आहेत. जेणे करून वारकरी लगेच वाचून सुविधा असलेले ठिकाणी जाता येणार आहे. अनेक वारकरी यांना वाचता येत नसलेने लोगो देखील काढणेत आला आहे. रात्रीचे वेळी प्रकाशमान होतील अशै प्रकारे व्यवस्था करणेत आलेली आहे. 

उळे येथील गजानन महाराज पालखी मार्गाची सिईओं कडून पाहणी
………………..
सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत उळे येथे संत गजाजन महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होते. या ठिकाणी स्वागत व्यवस्था व वारकरी यांचे साठी देणेत येणारे सुविधांची पाहणी जिल्हा परिषदेचे
सिईओ कुलदीप जंगम यांनी केली. रात्री वाजे पर्यंत उळे येथे व्यवस्था पाहून त्यांनी विविध सुविधांबाबत सुचना केल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages