माळशिरस तालुक्यात पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होत नसल्यामुळे बळीराजा त्रस्त झाला आहे
अकलूज (कटूसत्य वृत्त):- यावर्षी पावसाने मे महिन्यातच दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण पसरले असताना. माळशिरस तालुक्यात पेरणीसाठी वातावरण पोषक झाले आहे पण बाजारात बियाणे उपलब्ध होत नसल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.शेतीची कामे वेळेत झाली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा पीकाच्या उत्पादनात होतो.
माळशिरस तालुक्यातील काही गावामधे कृषी मंडल अधिकाऱ्यास संवाद साधता असे समजले की,बी-बियाणे यांचा बाजारात पुरेसा साठा उपलब्ध नाही.त्यामुळे पेरणीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना बि-बियाणासाठी बाजारात भटकंती करावी लागत आहे.सध्या बाजारपेठत बी-बियाणांचा तुटवडा भासत आहे.सध्या तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणी करण्यासाठी उत्सुक आहे परंतू बी बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करत आहे.या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष सागर घाडगे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केली.माळशिरस तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना पेरणीसाठी बी-बियाणे उपलब्ध करून द्यावे.अशी मागणी केली आहे.
0 Comments