स्वच्छ पाणी देणं ही माझी जबाबदारी- सरपंच मयेकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 24, 2025

स्वच्छ पाणी देणं ही माझी जबाबदारी- सरपंच मयेकर

 स्वच्छ पाणी देणं ही माझी जबाबदारी- सरपंच मयेकर



 अलिबाग (कटूसत्य वृत्त):-  तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे सरपंच नात्याने माझी जबाबदारी असून गावात याआधीपासून एक RO प्रकल्प कार्यरत आहे. आज दुसऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले, पण इतक्यावर थांबता येणार नाही. आज जेव्हा गावातल्या महिलांना आणि वडीलधाऱ्या माणसांना समाधानाने पाणी भरताना पाहते, तेव्हा जाणवतं – स्वच्छ पिण्याचं पाणी हे फक्त सुविधा नाही, तर गरज असल्याचे प्रतिपादन सरपंच हर्षदा मयेकर यांनी नागाव बंदर येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी केले.
     यावेळी ग्रामपंचायतीचे  माजी सरपंच  नंदकुमार मयेकर,ग्रामविकास अधिकारी श्वेता कदम, सदस्या निकिता पाडेकर,.कल्पना काठे, मंगल नागे,नागांव बंदर विभागातील ग्रामस्थ, पंच मंडळी, ज्येष्ठ नागरिक व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
       त्या पुढे म्हणाल्या, “उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई वाढत चालली आहे. अशा वेळी प्रत्येक नागावकराला सुरक्षित पिण्याचं पाणी मिळणं, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे निधी उपलब्ध होताच नागावच्या प्रत्येक विभागात अशा एकूण १० जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
     हा जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्णपणे स्वयंचलित असून, गावकऱ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ही एक महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक खोलीचे संपूर्ण बांधकाम सचिन राऊळ यांनी केले तर बाह्य परिसरातील मार्ग सुविधा प्रितेश घरत यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages