Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

 छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न



सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६८व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी आज शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलिस प्रशासन व विविध मिरवणूक काढणाऱ्या मंडळांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
या वेळी पोलिस प्रशासनाने मंडळांच्या अडचणी जाणून घेतल्या असून, योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. बैठकीस सोलापूर शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी, विविध मंडळांचे प्रतिनिधी तसेच शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments