Hot Posts

6/recent/ticker-posts

देशातल्या नागरिकांना पडलेले प्रश्न:

 देशातल्या नागरिकांना पडलेले प्रश्न:


1. दहशतवादी पहलगाममध्ये कसे आणि कुठून आले?

2. गुप्तचर संस्थांकडे intelligence होता का? त्यांनी तो सरकारला दिला होता का?

3. गुप्तचर संस्थांनाही या कटाचा पत्ता लागला नसेल तर या अपयशासाठी जिम्मेदार कोण?

4. जर सरकारला सूचना मिळाली असेल तर सरकारनः सुरक्षा यंत्रणा एवढी गाफील कशी राहू दिली? याची जबाबदारी कोणाची?

5. निघृण हल्ल्यानंतर दहशतवादी सुरक्षित पळून कसे गेले? त्यांना पकडण्याची जिम्मेदारी कोणाची? 

6. आपण फक्त दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले पण नंतर पाकनं स्वतः होऊन कुरापत काढली. हे माहित असूनही पाकला एवढा आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळालाच कसा? आपले राजदूत काय करत होते?

7. भारताची लाल आंखवाली जगप्रसिद्ध डिप्लोमसी नेमकी याच वेळी कुठे गेली? एकही देश आपल्या बाजूनं का उभा राहिला नाही? हे अपयश जयशंकर यांचं की मोदींचं? 

8. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी मोदींची घनिष्ठ मैत्री असूनही युद्ध सुरू होताच आम्ही कोणाचीच बाजू घेणार नाही असं स्टेटमेंट अमेरिकेनं का दिलं? 

9. आपली बाजू लखलखीत असूनही आपल्या एकाही मित्रराष्ट्रानं खुलेपणानं पाठिंबा का दिला नाही?

10. तटस्थ असलेली अमेरिका दुसर्‍याच दिवशी अचानक सक्रीय का झाली?

11. दोन्ही पक्षांनी वाटाघाटी केल्या असा दावा अमेरिकी उपराष्ट्राध्यक्षांनी केला आहे. वाटाघाटी कोणत्या मुद्द्यांवर आणि कुठे झाल्या? 

12. वाटाघाटीत काय देवाणघेवाण झाली? भारतानं युद्धबंदी सोडून काय मिळवलं? दहशतवादी मिळाले का? कुलभूषण जाधव यांच्यासारख्या एखाद्या तरी राजकिय बंदीवानाची सुटका झाली का? वाटाघाटीचा वृतांत सरकार लोकांना कधी सांगणार?

13. युद्ध सुरू होताच सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली तशी युद्ध अमेरिकेकडून संपवतांना का घेतली नाही? विरोधी पक्षाला विश्वासात का घेतलं नाही?

14. विरोधी पक्ष विशेष संसद अधिवेशनाची सतत मागणी करत असतांना सरकार अधिवेशन का घेत नाही?

15. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान का हजर रहात नाहीत? त्यांना बिहारची निवडणुक देशाच्या सुरक्षेपेक्षा मोठी वाटते का?

16. अमेरिकेनं मध्यस्थी आपल्या किंवा पाकिस्तानच्या विनंतीवरून केली की स्वतः होऊन?

17. दोन्ही देशात युद्धबंदी झाल्याची घोषणा सरकारच्या आधी अमेरिकेनं का केली? सरकारच्या सार्वभौम अधिकारांवरचं हे अतिक्रमण सरकारनं का सहन केलं.

18. अमेरिकेला त्यात काय मिळाले? आपल्याला काय मिळाले? एका उद्योगपतीची अमेरिकेतली शिक्षा रद्द व्हावी म्हणून तडजोड झाली असा दावा काही लोक करत आहेत. त्यात तथ्य आहे का हे सरकार का सांगत नाही? 

19. युद्धबंदी करत आहोत याची कल्पना अमेरिकेचं ट्वीट येण्याआधी आपल्या सेनादलाच्या प्रमुखांना, संसदेला, विरोधी पक्षांना दिली होती का?

20. भारतानं अमेरिकेची मध्यस्थी काश्मिर प्रश्नावर मान्य केली आहे का?

21. पाकिस्तानशी वाटाघाटी नाही असं सरकार म्हणते आणि काश्मिर प्रश्नी उभयतांशी आम्ही बोलू असं अमेरिका म्हणते. याचा अर्थ काय?

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रश्नांची उत्तरं भारताच्या नागरिकांनी कोणाकडे मागायची? भारताचं सरकार की दुसर्‍या कोणत्या देशाचं सरकार?

साभार:- जेष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी, यांच्या फेसबुक खात्यावरून
Reactions

Post a Comment

0 Comments