पावसामुळे ३५ टँकर झाले कमी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 30, 2025

पावसामुळे ३५ टँकर झाले कमी

 पावसामुळे ३५ टँकर झाले कमी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे टँकरची संख्या ६९ वरुन ३४ इतकी झाली असून, ३५ पाण्याचे टँकर बंद झाले आहेत. येत्या काळात पाऊस असाच सुरू राहिल्यास टँकर आणखी घटणार आहेत. सध्या जिल्ह्यातील ३२ गावांतील ३३८ वाड्यावरील ८० हजार २०६ लोकांना, ३७ हजार जनावरांना ३४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसात टँकरच्या संख्येत घट होणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली. दरम्यान, चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ५९ गावे, ५८७ वाड्यांतील एक लाख ४५ हजार ९९० लोकांना, ६० हजार जनावरांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, गेल्या दहा दिवसापासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस पडत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे गावे, वाड्यांवरील ३५ टँकर बंद करण्यात आले आहेत.


चौकट   

तालुकानिहाय  टँकर 

सांगोला - ३, मंगळवेढा - ६, माढा -  १, करमाळा ७, माळशिरस ८, मोहोळ - ०, पंढरपूर- ०, बार्शी - o, दक्षिण सोलापूर- ५, अक्कलकोट - २ उत्तर सोलापूर - २, एकूण - ३४

जिल्ह्यात ६९ टँकरने दीड लाख नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असल्याने पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३४ टँकर बंद करण्यात आले आहेत.

- संजय धनशेट्टी,

कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages