Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघाने सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा'

 मराठा सेवा संघाने सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा'



अकलूज / (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ हा केवळ मराठ्यांचाच आहे अशी समाजामध्ये जी भावना झाली आहे ती मोडून काढा. दुसऱ्या समाजातील चांगले गुण घ्या, त्यांचा आदर करा व छत्रपती शिवरायांप्रमाणे सर्वांना पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न करा असे आवाहन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.

शंकरनगर - अकलूज येथील स्मृती भवन मध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने तीन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे होते. या अधिवेशनाची सोमवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली.

मराठा सेवा संघाच्या वतीने जयसिंह मोहिते-पाटील यांना छत्रपती शाहू महाराज सामाजिक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे, सिने कलावंत किरण माने, शिवशाहीर राजेंद्र कांबळे, जिजाऊ रथयात्रकार अर्जुन तनपुरे, सौरभ खेडेकर यांचा विशेष पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी
स्वागताध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे, कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, प्रकल्प संचालक पुरुषोत्तम कडू आदींसह राज्यातील पदाधिकारी या तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित होते.

महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी केंद्रीय कार्यकारणी सदस्य उत्तमराव माने शेंडगे, धनाजी माने, जिल्हा सचिव हेमलाता मुळीक, मनोरमा लावंड, जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड वनिता कोरटकर, प्रियाताई नागणे, शारदा चव्हाण, मनीषा जाधव, सुवर्णा घोरपडे, रवींद्र पवार, अशोकराव रणवरे, दिगंबर मिसाळ, नवनाथ कोडक, सिद्धेश्वर नागटिळक, डॉ विश्वनाथ आवड, शिवाजी शिंदे, बाळासाहेब पराडे, डॉ. अमोल माने, सचिव राजेंद्र मिसाळ, निनाद पाटील आदींनी परिश्रम घेतले.

चौकट
विविध विषयांवर विचारमंथन
सकाळी नवोदित कवींचे काव्यसंमेलन, त्यानंतर परिसंवाद झाला. त्यानंतर नाचू किर्तनाचे रंगी या विषयावर गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान, दुपारी महिलांचे जग आणि जगणे या विषयावर स्नेहा टोम्पे, यवतमाळ यांचे व्याख्यान, त्यानंतर नित्य नवे कायदे, नित्य नवा संघर्ष या विषयावर अॅड. मिलिंद पवार, पुणे यांचे व्याख्यान, कला क्षेत्रातील जातवाद आणि बहुजन समाज या विषयावर किरण माने सिने कलाकार यांचे व्याख्यान झाले.

Reactions

Post a Comment

0 Comments